जिल्हा पोलीस अधीक्षकांचे सारंगखेड्यात मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:58 PM2020-04-19T12:58:48+5:302020-04-19T12:58:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : कोरोना व्हायरस जिल्ह्यात आल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. त्यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा पोलीस ...

Guidance of District Superintendent of Police in Sarang Khed | जिल्हा पोलीस अधीक्षकांचे सारंगखेड्यात मार्गदर्शन

जिल्हा पोलीस अधीक्षकांचे सारंगखेड्यात मार्गदर्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : कोरोना व्हायरस जिल्ह्यात आल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. त्यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सारंगखेडा व येथील पोलीस चेक पोस्टवर भेट देऊन उपस्थित कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या तापी पुलाच्या सरहद्दीवरील पोलीस चेक पोस्ट व हिंगणीसह विविध गावांना भेटी देत येथील पोलीस चेक पोस्टवरील पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर जिल्ह्यातील, राज्यातील अनधिकृतपणे कोणी व्यक्ती प्रवेश करणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच वाहनांमध्ये अवैधरीत्या प्रवास करून कोणी व्यक्ती आपल्या जिल्ह्यात प्रवेश करणार नाही, घरातून कोणी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणार नाही, रस्त्यावर फिरणाºया रिकाम टेकड्यांना व सकाळ-संध्याकाळी मॉर्निंग वॉकसाठी फिरणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या सोबत सारंगखेडा गावातील बाजारपेठ व मुख्य रस्त्यावर फिरून परिस्थिती पाहिली तर हिंगणी येथील चेक पोस्टवर पोलीस हवालदार राजू भील, होमगार्ड घनश्याम सोनवणे, किसन ठाकरे आदी पोलीस कर्मचारी व सारंगखेडा चेक पोस्टवरील कर्मचाºयांना चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना केल्या.

Web Title: Guidance of District Superintendent of Police in Sarang Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.