पिंपळोद येथे शेतकऱ्यांच्या स्नेहमेळाव्यात मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:26 AM2021-01-15T04:26:58+5:302021-01-15T04:26:58+5:30

पिपळोद परिसरातील शेतकरी योगेश पटेल व अंकुश पटेल यांच्यासह अनेक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून गटशेती करतात. इतर शेतकऱ्यांनाही ...

Guidance at Farmers' Gathering at Pimpalod | पिंपळोद येथे शेतकऱ्यांच्या स्नेहमेळाव्यात मार्गदर्शन

पिंपळोद येथे शेतकऱ्यांच्या स्नेहमेळाव्यात मार्गदर्शन

Next

पिपळोद परिसरातील शेतकरी योगेश पटेल व अंकुश पटेल यांच्यासह अनेक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून गटशेती करतात. इतर शेतकऱ्यांनाही आपल्या ज्ञानाचा व शेतीविषयक अनुभवाचा मार्गदर्शन करून ते फायदा करून देत आहेत. सध्या त्यांच्या शेतात लावलेल्या मिरचीची परदेशात निर्यात होते. निर्यातक्षम अशी मिरची पाहण्यासाठी मध्यप्रदेश, महाराष्ट्र व परिसरातील शेतकरी नेहमी क्षेत्रभेट देतात. स्नेहमेळावा व भेटीदरम्यान या शेतकऱ्यांकडून गप्पा-गोष्टींमधून चर्चिल्या जात आहेत व एकमेकांचे शेतीविषयक नवीन व जुने अनुभव या मेळाव्याच्या निमित्ताने चर्चा करून त्यावर विविध मार्ग काढत शेतीक्षेत्रामध्ये चांगले कार्य सुरू आहे. या परिसरात योगेश पटेल, अंकुश पटेल, रितेश पटेल, लालू पटेल, आशिष पटेल, रामेश्वर पटेल (सामळदा), दिलीप निजरे (लोंढरे), राजेश पटेल, गणेश पटेल (वेलदा) यांच्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

Web Title: Guidance at Farmers' Gathering at Pimpalod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.