आदिवासी युवकांच्या गुणवत्तेला दिशा मिळावी : कविता राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:56 AM2018-02-28T11:56:29+5:302018-02-28T11:56:29+5:30

Guidance for the quality of tribal youth: Kavita Raut | आदिवासी युवकांच्या गुणवत्तेला दिशा मिळावी : कविता राऊत

आदिवासी युवकांच्या गुणवत्तेला दिशा मिळावी : कविता राऊत

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : दुर्गम भागातील आदिवासी युवकांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केल्यास आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताचा आलेख उंचावेल, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय धावपटू तथा सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत-तुंगार यांनी व्यक्त केले. मुंगबारी, ता.धडगाव येथे आयोजित सामाजिक कृतज्ञता व युवा साहित्य प्रबोधन मेळाव्यात त्या बोलत होत्या. याअंतर्गत मुंगबारी येथे आदिवासी युवकांसाठी साहित्य प्रबोधनासह मॅरेथॉन व तिरंदाजी स्पर्धा घेण्यात आल्या.
या कार्यक्रमात इंजि़ जेलसिंग पावरा यांच्या ह्यढोरक्या ते इंजिनियरह्ण या आत्मकथनाचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी साहित्यिक वाहरू सोनवणे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय धावपटू सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत-तुंगार, राष्ट्रीय तिरंदाज दिनेश भिल, एकता परिषदेचे महासचिव अशोक चौधरी, आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ.भरत वळवी, आदिवासी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश वळवी, माजी आमदार नरेंद्र पाडवी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हैदरअली नुराणी, डॉ.शांतीकर वसावा, प्रभु टोकीया, पोरलाल खरते, भगतसिंग पाडवी, प्रा.मोहन पावरा, आदिवासी बचाव आंदोलनाचे प्रा.अशोक बागुल, पावरा-बारेला महासंघाचे नामदेव पटले, कार्यकारी अभियंता अनिल पवार, कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, शरद पाटील, प्रा.रतिलाल पावरा, राजेश कनोजे, देवेंद्र निकम, डॉ.चंद्रकांत बारेला, दशरथ चौधरी, दोहाण्या पावरा, इंजि. विजय पाटील, सतिष वळवी, धनाजे बुद्रूकचे सरपंच डॉ.करमचंद पावरा आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मुंगबारी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यात पारंपरिक वेशातील आदिवासी बांधव सहभागी झाले होते. प्रसंगी विविध मान्यवरांचा गौरव जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविकात ह्यढोरक्या ते इंजिनिअरह्ण या आत्मकथनाचा प्रवास इंजि.जेलसिंग पावरा यांनी सांगितला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सातपुडा परिसर आदिवासी पावरा समाज उन्नती मंडळ शहादा, मॉ राणी काजल बहुउद्देशिय संस्था, तोरणमाळ, आदर्श युवा ग्रुप मुंगबारी, ग्रामस्थ, ग्रुप ग्रामपंचायत धनाजे बुद्रूक परिश्रम घेतले.

Web Title: Guidance for the quality of tribal youth: Kavita Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.