शेतक:यांच्या दुप्पट उत्पन्नासाठी मार्गदर्शन मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:40 PM2017-08-26T12:40:23+5:302017-08-26T12:40:23+5:30

Guidance rally for double income of farmers | शेतक:यांच्या दुप्पट उत्पन्नासाठी मार्गदर्शन मेळावा

शेतक:यांच्या दुप्पट उत्पन्नासाठी मार्गदर्शन मेळावा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतक:यांचे उत्पन्न 2022 सालार्पयत दुप्पट व्हावे हे उद्दीष्ट  साध्य करण्यासाठी शेतकरी मेळावे घेवून मार्गदर्शन करण्यात येत आहे. नंदुरबारातील कृषी विज्ञान केंद्रात 26 रोजी मेळावा होणार असून त्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
न्यू इंडिया मंथन- संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे.  कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा होणार आहे. सकाळी 10.00 वाजता होणा:या कार्यक्रमात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे उपस्थित राहतील.
कार्यक्रमात शेतक:यांचे उत्पन्न वाढीचे सूत्र यावर विभागीय विस्तार केंद्र धुळे येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.एम.एस. महाजन मार्गदर्शन करणार आहेत. सेंद्रीय शेती व भाजीपाला निर्यात यावर सेंद्रीय शेती तज्ज्ञ संतोष सहाणे तर कांद्याचे यशस्वी उत्पादन यावर कांदा व लसूण संशोधन संचालनालय राजगुरूनगर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.ए.जे. गुप्ता मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमात शेतक:यांसोबतच जिल्ह्यातील कृषी व ग्रामविकास संलगिAत अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत

Web Title: Guidance rally for double income of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.