‘अवकाशाशी नाते जोडूया’ नंदुरबार येथे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:33 PM2019-09-23T12:33:32+5:302019-09-23T12:33:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विश्व खगोल मंडळातर्फे ‘अवकाशाशी जोडूया  नाते’ या विषयावर नाशिक येथील खगोल मंडळाच्या सुजाता बाबर ...

Guide to 'Relationship to the Heavens' Nandurbar | ‘अवकाशाशी नाते जोडूया’ नंदुरबार येथे मार्गदर्शन

‘अवकाशाशी नाते जोडूया’ नंदुरबार येथे मार्गदर्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विश्व खगोल मंडळातर्फे ‘अवकाशाशी जोडूया  नाते’ या विषयावर नाशिक येथील खगोल मंडळाच्या सुजाता बाबर यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अध्यक्षस्थानी योजक या देश पातळीवरील संस्थेचे अध्यक्ष डॉ.गजानन डांगे होते. विश्व खगोल मंडळाचे उद्घाटन अनोख्या पद्धतीने करण्यात आले.  सुजाता बाबर यांनी अत्यंत सोप्या शब्दात अवकाशाच्या अंतरंगाची माहिती, ग्रह तारे याबाबत पॉवर पॉईंटच्या सहाय्याने माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात डॉ.डांगे यांनी भारतीय नक्षत्र परंपरेवर माहिती दिली. त्यानंतर प्रश्नोत्तराचे सत्र घेण्यात आले. 
प्रास्ताविकातून या खगोल मंडळाच्या संस्थापिका  शुभांगी  दाऊतखाने यांनी या उपक्रमामागील उद्देश व आगामी नियोजनाची माहिती दिली. मान्यवरांचा परिचय चेतना बिरारीस यांनी करून दिला. सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी तर आभार अभिजित खेडकर मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते.
 

Web Title: Guide to 'Relationship to the Heavens' Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.