अक्कलकुव्यातील बहरलेल्या निसर्गात रुंदावतेय असुरक्षेची दरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 11:57 AM2018-09-06T11:57:23+5:302018-09-06T11:57:28+5:30

The gulf of the widespread insecurity in Akkalkuva's blooming nature | अक्कलकुव्यातील बहरलेल्या निसर्गात रुंदावतेय असुरक्षेची दरी

अक्कलकुव्यातील बहरलेल्या निसर्गात रुंदावतेय असुरक्षेची दरी

Next

वाण्याविहिर : सातपुडय़ात खुललेला निसर्ग आणि ओसंडून वाहणारे धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत़ गर्द हिरवळ आणि धुक्यात हरवलेल्या रस्त्यांचा आनंद घेणा:या पर्यटकांना मात्र यंदाही सुरक्षेची चिंता सतावत असून वर्षानुवर्षे सुविधा न पुरवल्या गेल्याने असुरक्षेची दरी रूंदावली आह़े  
सातपुडय़ाच्या द:याखो:यातील 20 पेक्षा अधिक धबधबे ओसंडून वाहू लागल्याने याठिकाणी पर्यटकांची हजेरी लागत आह़े प्रामुख्याने लगतचे गुजरात राज्य आणि जिल्ह्यातील विविध भागातून हे पर्यटक याठिकाणी येत आहेत़ खाजगी वाहनाने विचारणा करत येथेर्पयत पोहोचणा:या या पर्यटकांना विविध सोयी सुविधा पुरवण्याबाबत यंदाही कारवाई झालेली नसल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े देवगोई घाटातून वाहणारे नैसर्गिक धबधबे तसेच दुर्गम व अती दुर्गम भागात असलेल्या पर्यटनस्थळार्पयत जाण्यासाठी रस्तेच नसल्याने जीव धोक्यात घालून पर्यटक मार्गस्थ होत असल्याचे चित्र सध्या आह़े या पर्यटकांसोबत एखादा अपघात किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याची खबर कोणाला द्यावी याचीही व्यवस्था रस्त्यावर कोठे नसल्याने पर्यटनस्थळे असुरक्षेचे माहेरघर ठरत आहेत़ 
प्रशासनाने सातपुडय़ातील आदिवासी बांधवांसह तालुका विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े यासाठी योग्य तो निधी मिळाल्यास पर्यटकांचा ओघ वाढून रोजगार उपलब्ध होणार आह़े अक्कलकुवा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील कांजीघाटचा धबधबा हा पावसाळ्यात पर्यटकांचे सर्वात मोठे आकर्षण असतो़ सध्या ओसंडून वाहणा:या या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी होत आह़े याठिकाणी अक्कलकुवा शहरासह गुजरातमधील पर्यटक हजेरी लावतात़ मोलगीकडे रस्त्यावरून देवमोगरा पुनवर्सन गावापासून जवळ असलेल्या या धबधब्यार्पयत जाण्यासाठी योग्य रस्ता नाही़ धबधबा जेथे आह़े तेथे कोणतीही सुरक्षा नाही़ ऐनवेळी दुर्घटना घडल्यास मदतकार्य करण्याचीही सोय नाही़ 
सातपुडय़ात थंड हवेचे ठिकाण असलेल्या डाब गावाच्या अलीकडे देवगोई घाट हा धबधब्यांचे माहेरघऱ याठिकाणी सध्या 20 पेक्षा अधिक छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत़ येथील देवगोईच्या धबधब्यार्पयत जाण्यासाठी रस्ता नसल्याने पर्यटक खाचखळग्यातून पायी जातात़ यात दुखापती होण्याची अधिक शक्यता असत़े 
दुर्गम भागात करंजखाडी, मोगरा याठिकाणी दहेल नदीवरील धबधबे आहेत़ तसेच ओघाणीचा खांबा घाट, गोरज्याबारीपाडा, ओहवा, खाईचा माजी सरपंचपाडा, पाटीलपाडा, कौलवीमाळचा घाट, तिंती घाट तसेच निंबीपाडा आणि ओलखाडीपाडा येथील मोठे धबधबे पर्यटकांचे आकर्षण ठरतात़ अनोळखी पर्यटकांना या धबधब्यांची माहिती तसेच तेथे पोहोचावे कसे याबाबत योग्य ती माहिती नसल्याने त्यांचे हाल होत आहेत़ यामुळे जागोजागी मदतकक्षांचे क्रमांक आणि धबधब्यांकडे जाण्याची माहिती देण्याची गरज आह़े 
 

Web Title: The gulf of the widespread insecurity in Akkalkuva's blooming nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.