नंदुरबारनजीक एक लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त
By मनोज शेलार | Published: April 12, 2023 05:36 PM2023-04-12T17:36:20+5:302023-04-12T17:36:55+5:30
गुजरातमधून शिंदखेडा येथे गुटखा नेला जाणार असल्याची माहिती नंदुरबार तालुका पोलिसांना मिळाली होती.
नंदुरबार : कोपर्ली, ता. नंदुरबार नजीक पोलिसांनी एक लाख ८८ हजार ३२० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. शिवाय तीन लाखांचे वाहन देखील जप्त करण्यात आले. याप्रकरणी चौगाव, ता.शिंदखेडा येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर गुलाब पाटील (३७, रा.चौगाव, ता.शिंदेखडा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनुसार, गुजरातमधून शिंदखेडा येथे गुटखा नेला जाणार असल्याची माहिती नंदुरबार तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कोपर्ली-ते हाटमोहिदा या दरम्यान रस्त्यावर पाळत ठेवली. संशयीतरीत्या जाणारे वाहन (क्रमांक एमएच ०५ एएक्स ३०८६) पोलिसांनी अडविले. वाहनाची तपासणी केली असता त्यात ७७ हजार ७९२ रुपये किमतीचा पान मसाला, ८७ हजार १२० रुपये किमतीचा तंबाखू मसाला, १३ हजार ७२८ रुपये किमतीच्या तंबाखूच्या पुड्या व इतर गुटखा मिळून आला. शिवाय पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीचे वाहन देखील जप्त केले. एकूण चार लाख ८८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबत पोलिस कर्मचारी सचिन पांडुरंग सैंदाणे यांनी फिर्याद दिल्याने किशोर गुलाब पाटील, (रा. चौगाव, ता. शिंदखेडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रतीक भिंगारदे करीत आहेत.