गुजरातमधून गुटख्याची सर्रास आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 12:33 PM2017-10-05T12:33:02+5:302017-10-05T12:33:02+5:30

तंबाखूमुक्त शाळा मोहिम : अन्न प्रशासन व पोलीस यंत्रणेने कारवाई करण्याची अपेक्षा

Gutkha's common arrival in Gujarat | गुजरातमधून गुटख्याची सर्रास आवक

गुजरातमधून गुटख्याची सर्रास आवक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : प्रशासनाने तंबाखूमुक्त जिल्हा परषिद  शाळा नंतर आता माध्यमिक शाळा अन् संस्थांसाठी कंबर कसली असली तरी गुजरात हद्दीतील गावांमधून सर्रास विमल सारख्या तंबाखूजन्य गुटखा पुडय़ांचा प्रचंड पुरवठा होत असल्याचे चित्र असून, हे रोखण्यासाठी अन्न प्रशासन अन् पोलीस या दोन्ही यंत्रणांना सक्त ताकीद देण्याची अपेक्षा आहे.  अन्यथा याबाबत कितीही प्रय} झाले तरी ते निष्फळ ठरण्याची शक्यता आहे.
कर्क रोगाने दिवसाला सहा लाख लोकांचा मृत्यू होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या रोगाचे दिवसागणिक वाढते प्रमाण लक्षात घेवून केंद्र राज्य शासनाने गेल्या दोन वर्षापासून तंबाखूमुक्त अभियान सुरू केले. त्यातही भावीपिढी या व्यसनास बळी पडू नये म्हणून त्यांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी सुरूवातीला या अभियानात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा समावेश करण्यात आला आहे. शाळांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा प्रशासनाचा असल्याने यंदापासून जिल्ह्यातील माध्यमिक शाळा अन् या शाळा चालविणा:या संस्था तंबाखूमुक्त करण्याचे अभियान राबविले जात आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांनी बुधवारपासून अभियानास सुरूवातदेखील केली आहे. विद्याथ्र्याना तंबाखूच्या दुष्परिनामाचे धडे देवून तंबाखूमुक्तीची शपथही देण्यात आली. साहजिकच या अभियानासाठी शाळा प्रशासन, व्यवस्थापन अन् शिक्षक युद्ध पातळीवर कामाला लागले आहे. शासनाने तंबाखू अथवा तंबाखू युक्त पुडय़ा खाणा:या कर्मचा:यावर 200 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याची सूचना केली आहे. 
याशिवाय राबविलेल्या अभियानाचा अहवाल शिक्षण विभागाच्या संबंधित अधिका:यांना देण्याची सूचनादेखील दिली आहे. तसेच भरारी पथक सुद्धा शाळांना भेट देतील, असा आटापिटा प्रशासनाने अभियानासाठी केला आहे. शिक्षकांच्या प्रय}ांनतर माध्यमिक शाळा तंबाखुमुक्त होतीलही मात्र येत्या 4 फेब्रुवारी 2018 पासून तंबाखुमुक्त शहर अन् जिल्ह्याचा टप्पा राबविला जाणार आहे. त्यासाठी प्रशासनापुढे मोठे दिव्य राहणार आहे. कारण गुजरात हद्दीत आपला जिल्हा वसला आहे. तसेच गुजरातमध्ये गुटखाबंदी नसल्याने हद्दीतील गावांमधून दररोज लाखो रुपयांचा विमल  सारख्या तंबाखुजन्य गुटखा पुडय़ांचा सर्रास पुरवठा होत असल्याचे चित्र आ हे. या गुटखा पुडय़ा ग्रामीण खेडय़ांच्या कानाकोप:यात पोहोचविल्या जात असतात. साहजिकच या पुडय़ा खाणा:यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. 
मोठय़ा माणसांबरोबरच अगदी लहान-लहान बालके देखील या गुटखा पुडय़ांचे बळी ठरले आहे. शाळा परिसरात शिक्षकांच्या दबावात खात नसले तरी शाळा सुटल्यानंतर पुडय़ांचे सेवन मुले करीत असल्याचे सांगितले जाते. जिल्हा प्रशासनाने गुजरात हद्दीतून होणा:या या तंबाखुजन्य पुडय़ांच्या पुरवठय़ावर ठोस कार्यवाही केली पाहिजे. तरच अभियानाला सुद्धा चांगला प्रतिसाद लाभेल. अन्यथा हे अभियान केवळ कागदापुरताच उरेल. मात्र यावर ठोस कारवाई करणा:या यंत्रणांनी शंकरा ऐवजी गांधारीचा अवतार घेतल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पोलीस म्हणतात कारवाईचा अधिकार आम्हास नाही तो अन्न व प्रशासन विभागाला आहे. तर अन्न व प्रशासन म्हणते अधिकार आम्हाला असला तरी तो पोलिसांनाही आहे. साहजिकच या यंत्रणांच्या तू-तू-मै-मै मुळे गुटखा तस्करांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे विब बोभाटपणे गुटखा पुडय़ांचीही तस्करी होत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा प्रशासनाने तंबाखूजन्य गुटखा पुडय़ांच्या मुळावरच घाव घालण्यासाठी गुजरात हद्दीतून होत असलेल्या पुरवठय़ावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे

Web Title: Gutkha's common arrival in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.