नंदुरबारातील व्यायामशाळा गजबजू लागल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:04 PM2017-11-21T12:04:23+5:302017-11-21T12:04:31+5:30
संतुलीत आहाराचा सल्ला : जेष्ठ नागरिकांकडूनही मॉर्निग वॉकला प्राधान्य
ल कमत न्यूज नेटवर्कंनंदुरबार : सध्या नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र थंडीची चाहूल लागली आह़े त्यामुळे आता तरुणांकडूनही आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यायामशाळांमध्ये तसेच मॉर्निग वॉकला जाण्यास सुरुवात करण्यात येत आह़े शहरातील विविध व्यायमशाळांमध्ये आता गर्दी दिसू लागली आह़े आरोग्यवर्धनासाठी हिवाळा हा ऋृतु लाभदायक मानला जातो़ मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला भाजीपाला, रसाळ फळे आदींची रेलचेल असत़े शिवाय हिवाळ्यात दोन घासही जरा जास्तच जात असल्याने या दिवसांमध्ये युवकांकडून व्यायामाला सर्वाधिक महत्व देण्यात येत असत़े शहरात मोठय़ा प्रमाणात व्यायामशाळा आह़े त्यातही अनेक युवक सहभागी होत आह़े असे असले तरी शहरातील जगतापवाडी चौफुली ते कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणा:या रोडावर मोठय़ा प्रमाणात युवकांसह जेष्ठ नागरिकही मॉर्निग वॉकला जात असल्याचे चित्र दिसून येत आह़े फुटपाथवर लावण्यात आलेल्या व्यायामाच्या साहित्यांचाही उपयोग बहुसंख्य नागरिकांकडून करण्यात येत आह़ेबहुतेक युवकांकडून पहाटे मैदानावर धावण्याचा सरावही करण्यात येत आह़े थंडीत वाढ होत असली तरी युवकांकडून पहाटेच व्यायामासाठी बाहेर पडण्यात येत आह़े हिवाळा लागला असल्याने शहरातील व्यायामशाळा युवकांनी गजबजू लागल्या आहेत़ आरोग्य तज्ज्ञांकडूनही संतुलीत आहार, व्यायामाच्या महत्वाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आह़े युवकांनाही आता व्यायामाचे महत्व कळु लागले असल्याने त्यांच्याकडून व्यायामाला अधिक महत्व देण्यात येत आह़े त्यासोबतच शहरात विविध अत्याधुनिक उपकरणे असलेल्या व्यायामशाळा उपलब्ध असल्याने युवकांना या व्यायामशाळा आकर्षित करीत आहेत़ बहुतेक व्यायामशाळांमध्ये ‘फिटनेस ट्रेनर’ही उपलब्ध आहेत़ ते युवकांना संतुलीत आहार व तंत्रशुध्द व्यायामाबाबतही मार्गर्शन करीत असतात़ त्यामुळे युवकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आह़े अनेक युवकांकडून शरिरसौष्ठवा स्पर्धामध्येही भाग घेण्यासाठी व्यायामशाळांमध्ये कसरत करण्यात येत असत़े त्यातच केवळ हिवाळ्यातच व्यायामशाळेत प्रवेश घेणा:या ‘सिजनेबल’ युवकांचीही आता संख्या वाढत असल्याने व्यायामशाळा गजबजू लागल्या आह़े अनेक व्यायामशाळा या सायंकाळीही सुरु असतात़