आदित्य ठाकरे राज्यात फिरले असते तर बिहारला जाण्याची गरज भासली नसती - गुलाबराव पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:36 PM2022-11-24T12:36:54+5:302022-11-24T12:37:37+5:30

Gulabrao Patil : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे मुद्दे नसून हा या पक्षात जाईल, तो त्या पक्षात जाईल असे आरोप होत असतात. त्यामुळे या आरोपांना किती महत्व देणे हा ज्याचा त्याचा  प्रश्न असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Had Aaditya Thackeray roamed the state, there would have been no need to go to Bihar - Gulabrao Patil | आदित्य ठाकरे राज्यात फिरले असते तर बिहारला जाण्याची गरज भासली नसती - गुलाबराव पाटील 

आदित्य ठाकरे राज्यात फिरले असते तर बिहारला जाण्याची गरज भासली नसती - गुलाबराव पाटील 

googlenewsNext

नंदुरबार : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना आणि शिंदे गटांच्या सभांसाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यापासून ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आदी प्रश्नांवर पत्रकारांशी संवाद साधला. 

आदित्य ठाकरे देशातील युवा नेत्यांना भेटण्यासाठी विविध राज्यांचा दौरा करणार आहे. काल बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. या संदर्भात बोलताना आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले असते, तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची गरज भासली नसती, अशी बोचरी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. 

कालच्या सिन्नर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याचा आरोप होत असून मुख्यमंत्री स्वतः कर्तृत्वान असून त्यांना स्वतःचे भविष्य पाहण्याची गरज नसून ते भविष्यकाराचे भविष्य पाहतील. राजकारणात नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावनांच्या आदर करावा लागतो. कार्यकर्त्यांनी सांगितलं म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात असलेल्या जत तालुक्यातील गावांवर आपला दावा केला आहे. या दाव्यानंतर  गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्रातील सीमा भागातील ग्रामपंचायतीचा साधा वार्ड सुद्धा कर्नाटकमध्ये जाऊ देणार नाही. राज्य सरकारसाठी हा प्रश्न संवेदनशील असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. 

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद सुरू असून वाद वैयक्तिक पातळीवर गेले आहेत. त्यामुळे दोघा नेत्यांनी संयम ठेवावे. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून दोनी नेत्यांनी बोलताना संयम ठेवावा कुणी आरे केले तर दुसरा कारे करेल, त्यामुळे सामाजिक जीवनात वागताना तारतम्य  ठेवणे महत्त्वाचे असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे मुद्दे नसून हा या पक्षात जाईल, तो त्या पक्षात जाईल असे आरोप होत असतात. त्यामुळे या आरोपांना किती महत्व देणे हा ज्याचा त्याचा  प्रश्न असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. राज्यातील महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. निवडणुका ह्या प्रशासकीय बाब असून याचा कोणी काही अर्थ काढू नये जो तो पक्ष याचा आपल्यासाठी सोयस्कर पद्धतीने अर्थ काढत असतो, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

Web Title: Had Aaditya Thackeray roamed the state, there would have been no need to go to Bihar - Gulabrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.