वर्षभरात मंजूर केलेल्या निम्मे शेततळ्यांची कामे अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:57 AM2019-05-31T11:57:13+5:302019-05-31T11:57:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरडवाहू क्षेत्राचा विकास होऊन जलसंधारण व्हावे या उद्देशाने जिल्ह्यात कृषी विभाग राबवत असलेल्या मागेल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरडवाहू क्षेत्राचा विकास होऊन जलसंधारण व्हावे या उद्देशाने जिल्ह्यात कृषी विभाग राबवत असलेल्या मागेल त्याला शेततळे योजना रखडली आह़े वर्षभरात 1 हजार 600 शेततळे उभारणीचे आदेश काढूनही निम्मे शेततळे अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आह़े
राज्य शासनाने 2016 पासून मागेल त्याला शेततळे ही योजना अंमलात आणली होती़ सर्वसाधारण वर्गातील शेतक:यांसाठी किमान दीड एकर तर आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शेतक:यांच्या साधारण 1 एकर क्षेत्रासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना होती़ 2018-19 या वर्षात कोरडवाहू शेतीत पाणी प्रयोग करुन जमिनीला संजीवनी देण्यासाठी 4 हजार 518 शेतक:यांनी अर्ज केले होत़े यातील 3 हजार 438 शेतक:यांना पात्र ठरवण्यात येऊन त्यातील योग्य, अयोग्य, छाननी आणि तपासणीचे कामकाज करुन शेवटी 1 हजार 696 शेतक:यांना शेततळ्याचे काम सुरु करण्याचे आदेश काढण्यात आले होत़े यासाठी शासनाने 2 कोटी 14 लाख 70 हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता़ हा निधी शेतक:यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु आह़े कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार शासनाकडून थेट बँकेत शेतक:यांनी केलेल्या कामाच्या आधारे पैसे वर्ग करण्यात येत आहेत़ तरीही गेल्या चार वर्षात नंदुरबार जिल्ह्यासाठी 4 कोटी 56 लाख 11 हजार रुपयांचा खर्च केला आह़े एवढय़ा मोठय़ा प्रमाणात खर्च करुन उभारलेली 2 हजारच्यावर शेततळी गेली कुठे असाही प्रश्न आह़े सातपुडय़ाच्या दुर्गम भागात चालू वर्षात केवळ 12 ठिकाणी शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत़ परंतू या तालुक्यातून शेकडोंच्या संख्येने अर्ज करणा:या व कार्यारंभ आदेश घेणा:या शेतक:यांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आह़े
आकारमानानुसार किमान एका शेततळ्यासाठी 22 हजार 110 ते 50 हजार रुपयांचे अनुदान पात्र शेतक:यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात येत़े यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातील शेतक:यांनी ऑनलाईन अर्ज भरुन सेवाशुल्कही दिले होत़े यातील किती शेतक:यांचे शेततळे पूर्ण होऊन जलसंधारण होत आहे याबाबत जिल्ह्यात माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही़
2018-19 या वर्षात कृषी विभागाने काढलेल्या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यासाठी 1 हजार 500 शेततळ्यांचा लक्षांक देण्यात आला होता़ यासाठी 1 कोटी 27 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ यातून कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या साडेतीन हजार अर्जापैकी 1 हजार 696 लाभार्थीना कामे सुरु करण्याचे आदेश काढण्यात आले होत़े यातील 1 हजार 652 जणांची आखणी कृषी विभागाने करुन दिली होती़ तर 986 शेततळे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाचा आह़े परंतू उर्वरित 666 शेततळ्यांचे काय, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़े 1 हजार 696 पैकी 44 पात्र शेतक:यांच्या अर्जाबाबतही योग्य ती कारवाई झालेली नसल्याचे समोर आले आह़़े 2016-17 या वर्षात 1 हजार शेततळ्यांचा लक्षांक देण्यात आला होता़ यासाठी 3 हजार 382 अर्ज आले होत़े यातील 1 हजार 592 शेतकरी पात्र ठरुन 1 हजार 565 जणांना कार्यारंभ आदेश दिले होत़े पैकी 436 शेततळे पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आह़े
15 बाय 15- 3 घनमीटर ते 30 बाय 30 - 3 घनमीटर क्षेत्रात निर्माण होणा:या शेततळ्यासाठी 225 ते 900 चौरस मीटर क्षेत्र वापरले जात़े शेतक:यांनी कार्यारंभ आदेश दिल्यानंतर खोदकाम केले होत़े योजेनत दारिद्रय़रेषेखालील शेतक:यांचा समावेश करताना आत्महत्याग्रस्त शेतक:यांच्या कुटूंबियांना प्राधान्य देण्याचे शासनाचे आदेश होत़े तसेच शासनाने नव्याने काढलेल्या आदेशानुसार पाच वर्षे दुष्काळ असलेल्या क्षेत्रात 50 पैसे पैसेवारी असलेल्या किमान एकातरी गावाचा या उपक्रमात सहभाग करुन घेण्याचे सक्तीचे केले होत़े शेततळ्यांसाठी जिल्हास्तरावर आढावा समितीची स्थापना केली आह़े परंतू याबाबत आढावा घेतल्याची माहिती नाही़