कुपोषीत बालकांवरील खर्च आणला निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:49 AM2017-10-28T11:49:50+5:302017-10-28T11:51:31+5:30
खर्च कपातीचा फटका कुपोषणलाही
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शासनाच्या खर्च कपातीच्या धोरणाचा फटका आता कुपोषीत बालकांनाही बसणार आहे. ग्राम बालविकास केंद्रात भरती होणा:या बालकांवर दिवसाला 160 रुपये खर्च करण्याची तरतूद होती आता ती केवळ 75 रुपयांवर आणून ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात 166 बालविकास केंद्रे मंजुर असून त्यात जवळपास एक हजार 600 बालकांची कुपोषणाची श्रेणी सुधारण्यात येणार आहे.
कुपोषण आणि बालमृत्यूच्या आकडेवारीत जिल्हा राज्यात नेहमीच अग्रक्रमावर राहिला आहे. सध्या विविध उपाययोजना आणि आरोग्याच्या सुविधा दुर्गम भागातील पाडय़ार्पयत पोहचत असल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा अर्थात जिल्हा प्रशासनाने केलेला आहे. हे सर्व सुरू असतांना आता शासनाच्या खर्च कपातीचे धोरण कुपोषीत बालकांच्या मुळावर उठले आहे. कुपोषीत बालकांची श्रेणी सुधारण्यासाठी जिल्ह्यात सुरू होणा:या ग्राम बालविकास केंद्रातील एका बालकावर दिवसाला 160 रुपये खर्च करण्याची तरतूद पूर्वी होती. त्यात बालकाचा पोषण आहार, बालकाच्या पालकाची बुडीत मजुरी, त्याचे एकवेळचे जेवण यांचा समावेश होता. आता त्या खर्चात कपात करून निम्म्यावर अर्थात केवळ 75 रुपयांवर आणून ठेवण्यात आली आहे.