हातोडा पूल आज खुला होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:11 AM2017-08-15T00:11:56+5:302017-08-15T00:14:08+5:30

फक्त लहान वाहनांनाच परवानगी : राजकीय श्रेयामुळे पूल वाहतुकीसाठी खुला

 The hammer pool will be open today | हातोडा पूल आज खुला होणार

हातोडा पूल आज खुला होणार

Next
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाची माहितीपालकमंत्री जयकुमार रावल दाखवणार झेंडीनागरिकांमध्ये उत्सुकता

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : विविध सामाजिक संघटनांबरोबरच विद्यार्थ्यांच्या पालकांची तीव्र मागणी लक्षात घेऊन अखेर बहुप्रतीक्षित हातोडा पूल मंगळवारी दुपारी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे सामान्य जनतेची प्रतीक्षा आता संपणार आहे.
जिल्ह्याचे अंतर निम्म्याहून कमी करणाºया हातोडा पुलाचे काम सन २००८ मध्ये सुरू करण्यात आले होते. कामाच्या अतिशय संथगतीमुळे तब्बल नऊ वर्ष लागले. आता नुकतेच काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र उद्घाटनाशिवाय पूल वाहतुकीसाठी खुला करू नये, अशी भूमिका संबंधित विभागाने घेतली होती. त्यामुळे पूल तयार होऊनही जनतेबरोबरच विद्यार्थ्यांना प्रकाशामार्गे वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. त्यातही गुजरात हद्दीतील सद्गव्हाणजवळील पुलाचे नूतनीकरण करण्यात येत असल्याने पावसाच्या पुरामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. साहजिकच हातोडा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणीही काही सामाजिक संघटनांबरोबरच विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली होती. एवढेच नव्हे जनतेने १५ आॅगस्ट रोजी स्वत: उद्घाटन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे संबंधित यंत्रणेसह लोकप्रतिनिधीदेखील खडबडून जागे झाले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजला पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

नंदुरबार येथील एका कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी १५ आॅगस्ट रोजी हातोडा पुलाचे उद्घाटन करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी शिवसेना तसेच इतर विविध संघटनांनीदेखील इशारा दिला होता. आयतेच पुलाचे श्रेय काँग्रेससह इतरांना जाईल, या भीतीपोटी स्थानिक लोकप्रतिनिधींनी उद्घाटनाऐवजी पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न केले. राजकीय पक्षांच्या श्रेयाच्या वादामुळे निदान हातोडा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये दिसून आली.
हातोडा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असला तरी या पुलावरून लहान चारचाकी व दुचाकी वाहनांनाच परवानगी देण्यात येणार आहे. मोठ्या अवजड वाहनांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. कारण पुलाला जोडणाºया वळण रस्त्याअभावी मोठी वाहने शहरातूनच जाण्याची शक्यता आहे. या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊ शकते. यासाठी पोलीस बंदोबस्तदेखील लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.
पुलाचे उद्घाटन दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते होणार असले तरी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत वाहने सोडण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार उदेसिंग पाडवी यांनी दिली. या कार्यक्रमास खासदार हीना गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार विजयकुमार गावीत, आमदार के.सी. पाडवी, आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, अधीक्षक अभियंता अनिल पवार हे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सोमवारी पुन्हा एकदा पुलाची पाहणी करून हिरवा कंदील दिला.

 

Web Title:  The hammer pool will be open today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.