नंदुरबारकर साथीच्या आजारांनी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:23 AM2019-01-19T11:23:43+5:302019-01-19T11:23:49+5:30
नंदुरबार : वातावरणातील वारंवारचा बदल, डास व मच्छरांचा प्रादुर्भाव आणि पाणी टंचाईमुळे मिळेल त्या ठिकाणाहून उपलब्ध होणारे पाणी यामुळे ...
नंदुरबार : वातावरणातील वारंवारचा बदल, डास व मच्छरांचा प्रादुर्भाव आणि पाणी टंचाईमुळे मिळेल त्या ठिकाणाहून उपलब्ध होणारे पाणी यामुळे साथीच्या आजारांची आणि हिवतापच्या रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. तातडीने सव्र्हेक्षण करून उपाययोजना करणे आवश्यक आहे.
थंडीची कमी अधिक तीव्रता, कधी ढगाळ वातावरण असे वातावरण गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. त्यामुळे साथरोगाचे रुग्ण जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर दिसून येत आहेत. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्वच 74 मलेरिया केंद्रांवर अशा रुग्णांसाठी उपचार सुरू केले आहेत.
शासकीय जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या मलेरिया, टायफाईड, जहरी मलेरिया या रुग्णांची संख्या वाढत आहे. डॉक्टरांनीही त्याला दुजोरा दिला आहे.
नंदुरबार शहरातील दाटीवाटीच्या वस्तीत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. घन कचरा व्यवस्थापन करणा:या ठेकेदाराने महिनाभरापूर्वी काही भागात फवारणी सुरू केली होती. परंतु नंतर अध्र्यातूनच ती बंद करण्यात आली.
ग्रामिण भागात तर कुणीच वाली नसल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाने प्रभावी उपाययोजना केल्याचे म्हटले असले तरी ग्रामपंचायत स्तरावरच त्या त्या ग्रामपंचायतींना उपाययोजना कराव्या लागत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात 58 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 290 उपकेंद्रे, 13 ग्रामिण रुग्णालये, दोन उपजिल्हा रुग्णालये व इतर संस्थांद्वारे हिवताप नियंत्रणासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
रुग्णांना वेळीच क्लोरोक्विनचा औषधोपचार मिळावा, रक्त नमुना वेळीच घेता यावा या हेतूने जिल्ह्यात एक हजार 801 आशा कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून औषधोपचार केला जावून दैनंदिन गृहभेटीदरम्यान पाणी साठवणूकची ठिकाणे तपासली जात असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.