उष्ण लहरींमुळे नंदुरबारातील नागरिक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:42 PM2018-04-04T12:42:30+5:302018-04-04T12:42:30+5:30
तापमान वाढ : प्रशासनाने उपाय योजना करण्याबाबत अवर सचिवांच्या सूचना
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार : अती उष्ण लहरींमुळे नंदुरबारसह संपूर्ण खान्देशात चांगलाच उकाडा जाणवू लागला आह़े येत्या काही दिवसातसुध्दा हीच स्थिती राहणार असल्याचे कुलाबा येथील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े
गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारसह जळगाव व धुळे येथील तापमानाने चाळीशी पार केली आह़े त्यामुळे वाढत्या उष्णतेने नागरिक चांगलेच होरपळून निघत आहेत़ मार्च महिन्यांमध्येच तापमान 40 अंश सेल्शिअस इतके नोंदविले गेले होत़े एप्रिलच्या सुरुवातीला 41 अंशार्पयत तापमान पोहचले आह़े
पूर्व भागातून येणा:या अति उष्ण व कोरडय़ा वा:यांमुळे तापमानात वाढ झाली असून येत्या काही दिवसांत तापमानाची स्थिती अशीच राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े
दरम्यान राज्याचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिका:यांना पत्र पाठविले असून त्यात त्यांनी उष्णतेच्या काळात जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाने घ्यावयाची काळजी याबाबत सूचना केल्या आहेत़ यात, भारतीय हवामान खात्याने या वर्षी राज्यासह देशात विविध भागात उष्णतेची लाट मोठय़ा प्रमाणात जानवणार असल्याचा इशारा दिला आह़े त्याच बरोबर नेहमीपेक्षा यंदा प्रकर्षाने उष्णता जानवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आह़े यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना उष्णतेच्या लाटेसाठी नोडल अधिकारी म्हणून तर तहसीलदारांना तालुकास्तरावर नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात यावे अशा सूचना या वेळी देण्यात आल्या आहेत़
त्याच बरोबर स्थानिक माध्यमांचा वापर करुन उष्णतेच्या लाटेसाठी काय करु व काय करु नये याबाबत जनजागृती अभियान राबविण्याचाही सूचना या वेळी देण्यात आल्या आह़े दुपारी उष्णता जास्त असल्याने जिल्ह्यातील मंदिरे, सार्वजनिक इमारती, उद्याने दुपारी उघडी ठेवावी जेणे करुन वाटसरुंना आश्रय मिळू शकेल असेही सांगितले आह़े नागरिकांनी दुपारी विनाकारण बाहेर पडू नये असे सांगितले आह़े