अक्कलकुव्यात दुकान फोडून मुद्देमाल लांबवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 22:09 IST2019-09-13T22:09:45+5:302019-09-13T22:09:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा शहरातील जामिया पार्क भागातील दुकानातून जनरेटर आणि बॅटरी असा सव्वा दोन लाख रुपयांचा ...

अक्कलकुव्यात दुकान फोडून मुद्देमाल लांबवला
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा शहरातील जामिया पार्क भागातील दुकानातून जनरेटर आणि बॅटरी असा सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरटय़ांनी लंपास केला़ 3 सप्टेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला़
जामिया पार्कमधील मोहंमद जोहेर मोहंमद दर्गाही खलिफा यांच्या मालकीच्या दुकानातून 16 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान चोरटय़ांनी 45 हजार रुपयांचे इन्व्र्हटर आणि 1 लाख 25 हजार रुपयांची बॅटरी लंपास केली़ मोहंमद खलीफा हे मूळगावी लगA समारंभासाठी गेले असल्याने दुकान बंद होत़े 3 रोजी ते परत आल्यानंतर दुकानाचे शटर तोडलेले दिसून आल़े त्यांनी पोलीसात धाव घेत माहिती दिली़
याबाबत खलिफा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक वसावे करत आहेत़