मोबदल्याचे ठरलेले 500 रुपये दिले नाही म्हणून टाकला डोक्यात दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 12:30 PM2021-01-04T12:30:31+5:302021-01-04T12:30:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  पत्ता शोधून देण्यासाठी ठरलेले ५०० रुपये दिले नाही म्हणून युवकाचा डोक्यात दगड घालून खून ...

He did not pay the agreed 500 rupees and threw a stone at his head | मोबदल्याचे ठरलेले 500 रुपये दिले नाही म्हणून टाकला डोक्यात दगड

मोबदल्याचे ठरलेले 500 रुपये दिले नाही म्हणून टाकला डोक्यात दगड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  पत्ता शोधून देण्यासाठी ठरलेले ५०० रुपये दिले नाही म्हणून युवकाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. नंदुरबारातील जगतापवाडी भागात  २७ डिसेंबर रोजी रात्री घडलेल्या खुनाच्या घटनेचा उलगडा करण्यात व संशयित आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाला यश आले. संशयित युवक नंदुरबारातीलच  आहे. 
योगेश विठ्ठल सूळ (२४, रा.सरस्वतीनगर, ता.नंदुरबार) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबारातील जगतापवाडी चौफुलीवर २७ डिसेंबर रोजी मध्यरात्री एका युवकाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. मयत युवकाचे नाव राकेश दिवान खर्डे (ता.आडगाव, ता.शहादा) होते. त्याच्या खिशात त्याच्या मेव्हुणीचे आधारकार्ड आढळले होते. त्या पत्त्यावर पोलिसांनी तपास केला असता तो राकेश खर्डे असल्याचे निष्पन्न झाले. शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेने तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्या नातेवाइकांकडे तपास करण्यात आला. कौटुंबिक वादातून तर हा प्रकार घडला नाही? याची शहनिशा करण्यात आली. स्वत: एलसीबीचे निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी मयताच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांच्याकडून काही धागेदोरे मिळतात का? याची चाचपणी केली. केवळ नातेवाइकांना भेटण्यासाठी गेला होता एव्हढीच माहिती मिळत होती. नातेवाइकांकडे काही माहिती मिळत नसल्याचे पाहून पोलिसांनी नंदुरबार शहरात तपासावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी खबरींना अलर्ट केले. राजपूत यांनी आपल्या अनुभवाच्या कौशल्यावर मिळालेल्या माहितीवरून लिंक जोडणे सुरू केले.  मयत राकेश हा २७ रोजी शहादा येथून एसटी बसने नंदुरबारात आला होता. नातेवाइकांना भेटायचे, परंतु त्याच्याकडे पूर्ण पत्ता नव्हता. सायंकाळी तो बसस्थानका बाहेर अनेक वाहनचालकांना हात देऊन नातेवाइकांकडे सोडण्याचा आग्रह करीत होता. परंतु मयत हा दारू पिलेला असल्याने त्याला कुणी प्रतिसाद देत नव्हते. त्याच वेळी संशयित आरोपी योगेश सूळ हा तेथे त्याच्या दुचाकीसह आला. त्याला मयत राकेश याने नातेवाइकांकडे सोडण्याचा आग्रह केला. त्यासाठी ५०० रुपये देण्याचे कबूल केले. त्याच्या दुचाकीवर राकेश याला त्याने ठिकठिकाणी घेऊन फिरला, परंतु पूर्ण पत्ता नसल्याने नातेवाइकांपर्यंत ते पोहचू शकले नाहीत. जगतापवाडी चौफुलीवर योगेश याने ठरलेले ५०० रुपये मागितले असता ते देण्यास राकेश याने नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये  वाद झाला. वादात संतापाच्या भरात योगेश याने  तेथे जवळच पडलेला सिमेंटचा दगड घेऊन त्याच्या डोक्यावर टाकला. त्यात राकेश खर्डे याला गंभीर मार लागल्याने तो कोसळला. ते पाहून योगेश सूळ याने तेथून धूम ठोकली. 
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासूळ, आनंदा मराठे, अभय राजपूत, प्रमोद सोनवणे, विनोद जाधव, विकास अजगे, विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, तुषार पाटील, रमेश पाडवी यांच्या पथकाने केले.

संशयीत पोपटासारखा बोलू लागला... 
मयत व संशयीत यांचे भांडण ऐकणारे दोनजण मिळाले. त्यांनी भाषा कशी होती त्याचा उल्लेक केला आणि क्ल्यू मिळाला. एलसीबीच्या पथकाने पाच ते सहा जणांवर लक्ष केंद्रित केले. परंतु अनेक बाबीतून योगेश सूळ याच्यावर संशय पक्का झाला. दोन दिवस त्याच्या सर्व हालचालींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्याच्या हालचाली जास्तच संशयास्पद आढळल्याने त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. स्वत: पोलीस निरीक्षक राजपूत यांनी त्याचा ताबा घेत त्याला बोलते केले. तेव्हा त्याने खुनाची कबुली देत सर्व    घटनाक्रम कथन केला. कुठलेही धागेदोरे नसतांना, काहीही पुरावा नसतांना एलसीबीने खुनाचा गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश मिळविले. त्यामुळे    या भागात असलेले भीतीचे वातावरण दूर झाले.

चार पथकांनी चार प्रकारे काढली माहिती...
यासाठी एलसीबीने चार स्वतंत्र पथके तयार केली होती. चारही पथकांना वेगवेगळ्या जबाबदा-या देण्यात आल्या होत्या. त्यात अनुभवी कर्मचारी देखील नेमण्यात आले होते. कुणी नातेवाइकांकडे, कुणी महिलेचा वाद आहे किंवा कसा, कुणी दारू व नशेबाज यांच्यावर तर कुणी परिसरातील आणि एसटी स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे याद्वारे  शोध सुरू केला होता. राजपूत यांनी सर्व पथकांना योग्य मार्गदर्शन करून अखेर संशयीत आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळविले. 

धागेदोरे नसतांना केला तपास...
घटनेचे काहीच धागेदोरे नव्हते. संशयीताने काहीही पुरावा सोडलेला नव्हता. त्यामुळे तपासाचे आव्हान होते. परंतु आपल्या पथकांनी घेतलेली मेहनत व वरिष्ठांचे मिळालेले मार्गदर्शन यामुळे हा गुन्हा लवकर उघडकीस आणता आला.     
-विजयसिंग राजपूत,
पोलीस निरिक्षक, एलसीबी.

Web Title: He did not pay the agreed 500 rupees and threw a stone at his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.