सन्मान योजनेचे पैसे खात्यावर तरीही कर्ज शेतकऱ्यांच्या माथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 05:18 PM2018-12-05T17:18:19+5:302018-12-05T17:21:43+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अर्ज करणाºया जिल्ह्यातील ४७ हजार ५९० पैकी २३ हजार ९१५ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत़ यातील काहींच्या खात्यावर कर्जमुक्तीचे पैसे वर्ग झाले असले तरी अनेकांच्या खाती दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याने त्यांची ‘माफी’ रखडली आहे़

On the head of the Honor scheme, farmers still lend money to the farmers | सन्मान योजनेचे पैसे खात्यावर तरीही कर्ज शेतकऱ्यांच्या माथ्यावर

सन्मान योजनेचे पैसे खात्यावर तरीही कर्ज शेतकऱ्यांच्या माथ्यावर

Next
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची ३१ डिसेंबरला मुदत संपणारनंदुरबार जिल्ह्यातील २३ हजार शेतकºयांना कर्जमुक्तीनंदुरबार जिल्ह्यात ४७ हजार ५९० लाभार्थी

भूषण रामराजे ।
नंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अर्ज करणाºया जिल्ह्यातील ४७ हजार ५९० पैकी २३ हजार ९१५ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत़ यातील काहींच्या खात्यावर कर्जमुक्तीचे पैसे वर्ग झाले असले तरी अनेकांच्या खाती दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याने त्यांची ‘माफी’ रखडली आहे़ विशेष म्हणजे योजनेची मुदत संपण्याचा अवधी हा ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत असल्याने उर्वरित शेतकºयांचे काय असा प्रश्न आहे़
मार्च २०१७ पासून राज्यशासनाने शेतकºयांच्या कर्जमाफीची योजना आणली होती़ यातंर्गत बँकांकडून घेतलेल्या पीककर्जापैकी दीड लाख रुपये माफ करण्यात आले होते़ यासाठी शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज सादर करुन दिले होते़ या आॅनलाईन अर्जानंतर शासनाकडून देण्यात येणाºया याद्यांनुसार बँकांकडे थकीत असलेले दीड लाखांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरु झाली़ बँकेत दीड लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतकºयांच्या याद्यांचा पहिल्या टप्प्यात निपटारा करण्यात आला होता़ सुरुवातीला वेग पकडणारी ही सन्मान योजना गेल्या वर्षभरापासून रडखडत सुरु होती़
जिल्ह्यातील ९ राष्ट्रीयकृत बँका, १ खाजगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २७ हजार १९४ खातेदार शेतकºयांसाठी शासनाकडून १०७ कोटी ११ लाख ९९ हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यास मंजूरी देण्यात आली होती़ गेल्या वर्षभरात या २७ हजार शेतकºयांपैकी केवळ २३ हजार ९१५ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत़ उर्वरित ३ हजार २७९ शेतकºयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया ही तांत्रिक अडचणींमुळे रखडली आहे़ येत्या काळात त्यांनाही कर्जमाफी देण्यात येणार आहे़
परंतू उर्वरित १९ हजार ६७६ अर्जदार शेतकºयांच्या कर्जमाफीबद्दल कारवाई होत नसल्याने त्यांच्या बँकांमध्ये चकरा सुरुच आहेत़ बहुतांश शेतकºयांच्या खात्यावर पैसे आल्याचे सांगण्यात आले आहे़ परंतू त्यांचे पीककर्ज हे दीड लाखांपेक्षा अधिक आहे़ यंदा दुष्काळामुळे संकटात असलेल्या शेतकºयांची आर्थिक घडी विस्कटली आहे़ त्यात बँकेत पैसे भरण्यासाठी पुन्हा कर्जबाजारी व्हावे लागणार असल्याने शेतकºयांनी पाठपुरावा सोडून दिला आहे़ येत्या ३१ डिसेंबरपर्यंत या योजनेची अंतिम मुदत असल्याची माहिती आहे़ शासनाकडून त्यास साधारण तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचे संकेत आहेत़

जिल्हा बँकेचे १५ हजार खातेदार
गेल्या वर्षभरात बँक आॅफ बडोदाने ९८४ शेतकºयांना ५ कोटी ५५ लाख, बॅक आॅफ इंडियाने ८९२ शेतकºयांना ६ कोटी ३२ लाख, बँक आॅफ महाराष्ट्राने १ हजार ९७१ शेतकºयांना ११ कोटी ५८ लाख ८६ हजार, सेंट्रल बॅक आॅफ इंडियाने २ हजार ५३२ शेतकºयांना ११ कोटी ३६ लाख, देना बँकेने ११४ शेतकºयांना ५ कोटी ५३ लाख, ग्रामीण बँकेने १६२ शेतकºयांना ६ कोटी ९४ लाख, स्टेट बँकेने १ हजार ५०३ शेतकºयांना १२ कोटी ३८ लाख, युनियन बॅकेकडून ८८ शेतकºयांना ७ कोटी ८१ लाख तर जिल्हा बँकेकडून १५ हजार ६४९ शेतकºयांना ४० कोटी ६३ लाख ४६ हजार रुपयांचे वितरण केले आहे़

Web Title: On the head of the Honor scheme, farmers still lend money to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.