मुख्याधिका:यांच्या तीन पानी पत्राने नगरसेवक अवाक्

By admin | Published: January 16, 2017 12:30 AM2017-01-16T00:30:36+5:302017-01-16T00:30:36+5:30

तब्बल 23 सूचना : शहादा पालिका वतरुळात चर्चेचा विषय, गैरवर्तन केल्यास अपात्र करणार !

Headlines: Corporator Avak | मुख्याधिका:यांच्या तीन पानी पत्राने नगरसेवक अवाक्

मुख्याधिका:यांच्या तीन पानी पत्राने नगरसेवक अवाक्

Next



शहादा पालिका मुख्याधिका:यांनी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांवर आचारसंहिता लावल्याने पालिका वतरुळात तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्याधिका:यांनी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी दैनंदिन प्रशासन चालविताना वारंवार हस्तक्षेप न करण्याच्या, मंजूर नसलेली कामे न करण्याच्या तसेच बेकायदेशीर व नियमबाह्य ठराव मंजूर केल्यास ठरावाच्या बाजूने मतदान करणा:या सदस्यांना कायदेशीर अडचण ठरू शकते, अशा 23 सूचनांचे तीन पानी पत्रच नगराध्यक्ष व नगरसेवकांना दिले आहे.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात शहादा पालिकेची निवडणूक होऊन 22 डिसेंबर रोजी नूतन नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला होता. या वेळच्या नवीन सदस्यांमध्ये नगराध्यक्षांसह बहुतेक सदस्य नवीन असल्याने त्यांना पालिकेच्या कामकाजाची, प्रशासनाची, नगरपालिका कायद्याची माहिती व्हावी म्हणून            मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांना तीन पानी ‘लखोटा’ पाठवून पालिका नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मुख्याधिका:यांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांना अशा प्रकारची सूचना वजा आदेश          देण्याची शहादा पालिकेतील ही पहिलीच घटना असल्याने पालिका वतरुळात तो चर्चेचा विषय झाला  आहे.
मुख्याधिकारी गवळी यांनी सदस्यांना दिलेल्या पत्रात नगरपरिषदेचे प्रशासकीय प्रमुख मुख्याधिकारी असतात. त्यामुळे दैनंदिन प्रशासन चालविताना पदाधिका:यांनी हस्तक्षेप करणे हे बेकायदेशीर असल्याचे नमूद केले आहे. पदाधिका:यांनी परस्पर कुठल्याही कर्मचा:यांना अनावश्यक सूचना देऊ नये, मंजूर नसलेली           कामे करण्यास भाग पाडू नये, नगरपरिषदेची कुठलीही सार्वजनिक मालमत्ता राज्य शासनाच्या मंजुरीशिवाय हस्तांतर करू नये, पालिकेकडे पुरेसा निधी नसल्यास कुठलेही मंजूर काम करू नये, अशा कडक सूचना मुख्याधिका:यांनी सर्व सदस्यांना केल्या आहेत. मालमत्ता कर, पाणीपट्टी, दुकान भाडे, दुकान डिपॉङिाट व इतर येणी वसूल करण्यास पदाधिका:यांनी अडथळा आणू नये, सदस्यांनी वैयक्तिकरीत्या कुठलेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये. तसेच पालिकेची वाहने व इतर साधन सामग्रीचा वैयक्तिक लाभ घेऊ नये, अशीही सक्त ताकीद मुख्याधिका:यांनी दिली आहे. शहराचे विद्रूपीकरण होईल अशा पद्धतीने दुकाने लावणे, टप:या टाकणे, होर्डिग्ज, बॅनर्स लावणे, अतिक्रमण करणे, सार्वजनिक रस्त्यांना अडथळा आणणे अशा कुठल्याही बाबींना सदस्यांनी प्रोत्साहन दिल्यास अथवा सहकार्य केल्यास त्या सदस्यांचे अपात्रतेबाबत तरतूद असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. पालिका सदस्य आपले कर्तव्य बजावत असताना कोणतेही गैरवर्तन केल्यास सदर सदस्यांना अपात्र ठरविले जाऊ शकते किंवा पदावरून दूर केले जाऊ शकते, अशा इशारा मुख्याधिका:यांनी या पत्रातून दिला आहे.

Web Title: Headlines: Corporator Avak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.