मुख्यालयांमध्ये टपाली मतदानासाठी कक्ष झाले सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:41 AM2019-10-20T11:41:15+5:302019-10-20T11:41:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मतदान प्रक्रिया पार पाडणारे शासकीय कर्मचारी, शिक्षक आणि पोलीस यांच्यासाठी निवडणूक निर्णय अधिका:यांकडून त्या-त्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मतदान प्रक्रिया पार पाडणारे शासकीय कर्मचारी, शिक्षक आणि पोलीस यांच्यासाठी निवडणूक निर्णय अधिका:यांकडून त्या-त्या मुख्यालयील टपाली मतदानाची सोय करण्यात आली आह़े पोलीसांकडून शनिवारी पोस्टात मतपत्रिका पोहोच करण्यात आली़
मतदान प्रक्रिया राबवण्यात मोठा वाटा असलेल्या शासकीय कर्मचारी, अधिकारी, पोलीस, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी यांना टपाली मतदान करण्याची सोय करुन देण्यात आली आह़े नंदुरबार जिल्ह्यातील चारही मतदार संघासाठी नियुक्त केलेल्या केलेल्या कर्मचारी व शिक्षकांना रविवारी थेट त्या-त्या तालुका मुख्यालयी तयार केलेल्या टपाली मतदान कक्षात मतदान करता येणार आह़े दरम्यान पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचा:यांना देण्यात आलेल्या मतपत्रिका आणि सोबतचा अर्ज पाकिटबंद करुन पोस्ट करण्याची प्रक्रिया गेल्या आठवडय़ापासून सुरु करण्यात आली आह़े यांतर्गत नंदुरबार, शहादा, नवापुर, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील पोलीस कर्मचा:यांनी मतपत्रिका पोस्टात जमा करुन दिल्या आहेत़ पोस्ट खात्यामार्फत हे बंद लिफाफे निवडणूक निर्णय अधिका:यांकडे तातडीने हस्तांतरीत करण्यात येत आह़ेत़ नंदुरबार शहरात शनिवारी दिवसभरात 200 च्या जवळपास पोलीस कर्मचा:यांनी मतपत्रिका पोस्टात जमा केल्याची माहिती देण्यात आली आह़े
मतदान साहित्य वाटपापूर्वी मुख्यालयी मतदान कक्षात होणा:या टपाली मतदान होणार आह़े दरम्यान गेल्या वर्षी अनेक शिक्षकांनी टपाली मतपत्रिकेसोबत असलेल्या अर्जात ओळख म्हणून तहसीलदारांच्या सहीशिक्क्याऐवजी मुख्याध्यापकांचे सही शिक्के दिले होत़े यातून त्यांच्या मतपत्रिका वाया गेल्याचा प्रकार घडला होता़ यंदा असे घडू नये यासाठी प्रशासनाकडून सुचना करण्यात येत आहेत़