चिनोद्यात 450 घरांमध्ये आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:07 PM2018-09-21T13:07:51+5:302018-09-21T13:08:00+5:30

Health check-up in 450 homes in Chinodh | चिनोद्यात 450 घरांमध्ये आरोग्य तपासणी

चिनोद्यात 450 घरांमध्ये आरोग्य तपासणी

Next

चिनोदा/तळोदा : तालुक्यातील चिनोदा येथे डेंग्यूसदृश्य तापाचे दोन संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर पंचायत समिती आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आह़े विभागाने 16 जणांचे पथक याठिकाणी तैनात करून 450 घरांची तपासणी गुरुवारी करवून घेतली आह़े तपासणीदरम्यान डेंग्यूचे पाच संशयित रूग्ण आढळून आल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत़ 
चिनोदा येथे अभय किशोर मराठे व देवांशू जयराज मराठे या दोन बालकांना डेंग्यू सदृश्य तापाची लागण झाल्याचे बुधवारी समोर आले होत़े याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर गुरुवारी सकाळपासून आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी चिनोदा येथे दाखल झाले होत़े तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण यांनी 16 जणांच्या पथकासह ज्या घरांमध्ये दोघे बालक आजारी पडले तेथे चौकशी करून पाहणी केली़ कर्मचा:यांनी 450 घरांची तपासणी पूर्ण केली़ यातील पाच रूग्ण तापाचे आढळून आल़े डेंग्यू सदृश तापाचा संशयित रूग्ण आढळून आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी चिनोदा येथे तातडीची ग्रामसभा बोलावण्यात आली़ या ग्रामसभेत वैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण यांनी डेंग्यूबाबत मार्गदर्शन केल़े प्रसंगी ग्रामस्थांना डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यात जन्म घेत असल्याने जास्त काळ पाण्याची साठवण टाळणे गरजेचे आह़े घरातील फ्रिज, कुलर स्वच्छ ठेवले पाहिज़े घराच्या जवळपास रिकामे टायर पडून असल्यास त्याची तपासणी करून पाणी फेकून दिले पाहिज़े  गावातील नागरिकांनी कोरडा दिवस पाळून सहकार्य करण्याची अपेक्षा आरोग्य विभागाने व्यक्त केली़ गावात आढळून आलेल्या पाच संशयितांच्या रक्त नमुने तपासणीनंतर ते डेंग्यू निगेटिव्ह आढळून आल्याची माहिती आह़े पथकाकडून गावातील प्रत्येक घरात डासांच्या अळ्यांचा शोध घेऊन तपासणी करण्यात आली़ साचलेले डबके, गटारी यांच्यात औषध फवारणी करण्यात आली़ ठिकठिकाणी गटारी आणि सांडपाण्याच्या डबक्यात गप्पी मासेही सोडण्यात आल़े 
डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सायंकाळी संपूर्ण गावात धुरळणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े आरोग्य सेवक ज़ेबी़नाईक, एस़आऱमुळे, एऩएस़ तुपे, व्ही़डी़मोघे, डी़एम़ वळवी, देविदास पावरा, निलिमा वळवी, जिल्हा हिवताप कार्यालयातील क़ेआऱ धारबळे ए़डी़ गुमलाळू, आऱएस़वळवी, एस़व्ही़जाधव, आशा समन्वयक संध्या साळवे, उषाबाई ठाकरे, अरूणाबाई ठाकरे यांनी तपासणी करून रक्तनमुने फवारणी केली़ 
सरपंच मंजुळाबाई पाडवी, राजेंद्र पाडवी, भास्कर मराठे, ग्रामसेवक क़ेएम़ पावरा यांनीही गावात पाहणी केली़ या तपासणीदरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ़ चव्हाण यांनी गावातील पाण्याचा जलकुंभ स्वच्छ करण्याच्या व  उघडय़ा गटारी बंदिस्त करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला केल्या़ 
 

Web Title: Health check-up in 450 homes in Chinodh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.