सातपुडय़ातील दुर्गम भागात आरोग्यसेवा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:47 PM2018-09-18T12:47:55+5:302018-09-18T12:48:06+5:30
वाण्याविहिर : प्रशासन सातपुडय़ात सातत्याने सुविधा देऊन विकास करत असल्याचा दावा करत असला तरी अनेक समस्या येथे कायम आहेत़ दुर्गम भागातील ब:याच गावांमधून अद्यापही रूग्णांना आणण्यासाठी ‘बांबूलन्स’चा वापर होत असल्याचे चित्र असून रस्त्यांअभावी ही स्थिती निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येऊनही कारवाई करण्याबाबत हालचाली झालेल्या नसल्याने नाराजी व्यक्त होत आह़े
बांबूच्या मोठय़ा काठीवर चादर किंवा कांबळ बांधून केलेल्या झोळीला बांबूलन्स असे म्हटले जात़े सातपुडय़ातील ब:याच गावांमध्ये गंभीर रूग्ण याच प्रकारे रूग्णालयात पोहोचवले जात आहेत़ गोजरबारीच्या ओहवापाडा ता़ अक्कलकुवा येथे गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची निर्मिती करण्यात आलेली नाही़ याबाबत पाठपुरावा होऊनही कारवाई झालेली नाही़ यामुळे रूग्णाला गंभीर आजारी पडणा:या रूग्णाला उचलून किंवा झोळी अर्थात बांबूलन्सद्वारे आणावे लागत आह़े ओहवापाडा येथून दोन किलोमीटर उतार चालून ग्रामस्थ खाई ता़ अक्कलकुवा येथील मुख्य रस्त्यार्पयत आणत आहेत़ येथून रूग्णाला मोलगी किंवा अक्कलकुवा येथे रवाना करण्यात येत़े
ओहवा ग्रामपंचायतींतर्गत असलेल्या गोजरबारीच्या ओहवापाडा येथे दोन किलोमीटर रस्ता निर्मितीसाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाला संपर्क केला होता़ प्रशासनाने या मागणीला गांभिर्याने न घेतल्याने येथील समस्या आजही ‘जैसे थे’ आह़े़