मुसळधार पावसाने नवापूरला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:11 PM2018-06-27T12:11:34+5:302018-06-27T12:11:43+5:30

Heavy rain damaged Navapura | मुसळधार पावसाने नवापूरला झोडपले

मुसळधार पावसाने नवापूरला झोडपले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : पहाटे चार ते सहा वाजेच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने नवापूर तालुक्यास धुवून काढले. तालुक्यातील बोकळझर येथे रंगावली नदीचे पाणी घरात घुसल्याची व शहरातील मेमण गल्ली परीसरात नाल्याचे पाणी घुसल्याने काही घरांचे नुकसान झाल्याची घटना घडली. 
नवापूर तालुक्यात पहाटे जोरदार पाऊस बरसला. नदी-नाले दुथडी वाहून निघाले. अनेक ठिकाणी चार ते पाच तास फरशीवरुन वाहणा:या पाण्यामुळे वाहतुकीचा ग्रामीण भागात खोळंबा झाला होता. महसूल मंडळ निहाय झालेला पाऊस असा- नवापूर 40 मिलीमीटर, चिंचपाडा 162 मिलीमीटर, नवागाव 36 मिलीमीटर, विसरवाडी 47 मिलीमीटर, खांडबारा 26 मिलीमीटर असे  एकूण 311 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक पाऊस चिंचपाडा परिसरात झाला.
धनराट व बोकळझर गावाच्या दरम्यान रंगावली नदीवर पूल वजा बंधारा बांधण्यात आला आहे. बंधा:याच्या पाटय़ा काढण्यात आल्याने तेथे पुराच्या पाण्यासह वाहून आलेला कचरा अडकून पडल्याने नदीचे पाणी लगतच्या बोकळझर गावातील तीन घरांमधे घुसले.
सरपंच राहूल गावीत यांनी महसूल प्रशासनास घटनेची माहिती दिल्याने प्रभारी तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, मंडळ अधिकारी दिलीप कुलकर्णी, किशोर पेटकर, एस.टी. यादव यांनी भेट देऊन पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे सहायक अभियंता  संजय पाडवी व जेरा वळवी यांनी जेसीबी यंत्र लावून बंधा:याच्या पाटय़ा काढल्यानंतर पुराचे अडकलेले पाणी वाहून निघाले. नदी किनारी असलेल्या भामरमाळ येथील एका किराणा दुकानाचा कोपरा वाहून निघाला.
मरीमाता मंदीर जवळच्या के.टी. वेअर च्या पाटय़ा काढल्याच्या ठिकाणी नदीतून वाहून येणारा कचरा अडकल्याने के.टी वेअर लगत गत पावसाळ्यात पडलेल्या खड्डय़ातून पुराचे पाणी वाहून निघाल्याने तेथे केलेला भराव पुन्हा वाहून गेला. तेथे पडलेले भगदाड पूर्ववत करण्यासाठी 49 लाख रुपये मंजूर असूनही शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचार संहिता आड आल्याने ते काम पावसाळ्यापूर्वी होवू शकले नाही. शहरातील गरीब वस्तीत असलेल्या भूमिगत गटारी तुंबल्याने आरोग्य विभागाचे कामगार दिवसभर गटारी व नाल्यामध्ये अडकलेला कचरा वेगळा करण्यात गर्क होते. एकाच दिवसात झालेल्या पावसाने मात्र प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरा करुन टाकले एवढे मात्र नक्की.        

Web Title: Heavy rain damaged Navapura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.