अतिवृष्टीचा गणेशमूर्ती कारखान्यांनाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:28 PM2019-08-12T12:28:27+5:302019-08-12T12:28:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतिवृष्टीचा फटका गणेशमूर्ती कारखान्यांनाही बसला आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत 30 टक्के मूर्त्ीचेही बुकींग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अतिवृष्टीचा फटका गणेशमूर्ती कारखान्यांनाही बसला आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत 30 टक्के मूर्त्ीचेही बुकींग झाले नसल्याची खंत मूर्ती कारागिरांची आहे. दरम्यान, 12 दिवसांच्या संततधार पावसामुळे मूर्ती तयार करण्याच्या कामावर परिणाम झाला. त्याचाही फटका या उद्योगाला बसला आहे. यामुळे लाखोंचा फटका बसण्याची शक्यता आहे.
नंदुरबारची गणेश मूर्ती राज्यात प्रसिद्ध आहे. लाखो रुपयांची उलाढाल करणारा हा उद्योग यंदा मात्र अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे. आधीच परप्रांतीयांच्या आक्रमणामुळे या उद्योगाला घरघर लागलेली असतांना त्यात यंदा अतिवृष्टीने भर घातली आहे.
भव्य दिव्य मूर्ती
यंदाही नंदुरबारातील कारागिरांनी भव्यदिव्य गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. खरेदीदार दरवर्षाप्रमाणे येतील या अपेक्षेने या मूर्त्ीना आकार देण्यात आला आहे. रक्षाबंधनच्या आत किमान 70 टक्के मूर्त्ीची बुकींग झालेली असते.
नंदुरबार शहर आणि जिल्ह्यासह गुजरात व मध्यप्रदेशातील अनेक सार्वजनिक मंडळे त्यासाठी प्रय}शील असतात. मूर्ती पाहून आणि त्यात आणखी आपल्या पद्धतीने थोडेफार बदल करून घेत मूर्ती बूक केली जात असते. यंदा मात्र केवळ 30 टक्के ग्राहकांनीच तसा प्रतिसाद दिल्याचे कारागिरांनी सांगितले.
पावसाचा परिणाम
यंदा सलग 12 ते 13 दिवसांच्या संततधार पावसाने व दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीने या उद्योगाला अडचणीत आणले. पावसामुळे परराज्यातील तसेच जिल्ह्यातील मंडळांचे कार्यकर्ते देखील मूर्ती बुकींगसाठी येवू शकले नाही. आता पावसाची उघडीप मिळाल्याने बुकींगसाठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रतिकुल परिस्थितीत काम
येथील मूर्ती कारागिरांचे कारखाने गावातच आपल्या परिसरातील मोकळ्या जागेत आहेत. तात्पुरते शेड उभारून तेथे मूर्ती तयार केल्या जातात.
संततधार पावसामुळे शेडला गळती लागणे, वीज पुरवठा वारंवार खंडित होणे, पावसामुळे मजूर कामावर न येणे, कच्चा मालाचे नुकसान होणे असे प्रकार झाले. त्यामुळे 12 ते 13 दिवस काम अपेक्षीत झालेच नाही. त्याचा मोठा परिणाम या उद्योगावर झाला आहे.
आता गर्दीची शक्यता..
पावसाने उसंत दिली आणि गणेशोत्सवाचेही आता सर्वानाच वेध लागल्याने मूर्ती बुकींग आणि खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. रविवारी गुजरातमधील अनेक मंडळांचे कार्यकर्ते खाजगी वाहनांनी मूर्ती पसंत करणे आणि बुकींगसाठी आले होते. त्यामुळे मूर्ती कारागिरांकडे ब:यापैकी गर्दी झाली होती.
यंदा मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालाची किंमत वाढली आहे. त्यातच सुरत, बडोदा व अहमदाबाद येथे अतिवृष्टीमुळे हा माल मिळेनासा झाला होता. असे असतांनाही यंदा मूर्ती कारागिरांनी किंमती स्थिर ठेवल्या आहेत. नंदुरबारात अगदी पाच इंचपासून ते 20 फूटार्पयत उंचीच्या मूर्ती तयार केल्या जातात त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. मोठय़ा कारखान्यांसोबतच घरगुती लहान मूर्ती तयार करण्यात अनेकांचा हातखंडा आहे. त्यामुळे अनेक घरात देखील मूर्ती आकार घेवू लागल्या आहेत.