नंदुरबार जिल्ह्यातील 85 हजार शेतक:यांना मिळणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:15 PM2018-05-15T13:15:22+5:302018-05-15T13:15:22+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 15 : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतक:यांना 89 कोटी रूपयांचे मदतीचे पॅकेज शासनाने जाहिर केले होते त्यानुसार महसूल विभागाला हा निधी प्राप्त झाला आह़े यानुसार पात्र शेतक:यांच्या याद्या तयार करण्याचे काम लागलीच सुरू झाले असून जिल्ह्यातील 85 हजार बोंडअळीग्रस्त शेतक:यांना ही रक्कम वर्ग करण्यात येणार आह़े
कोरडवाहू क्षेत्रात नुकसान झालेल्या शेतक:यांना हेक्टरी 6 हजार 800 तर बागायत क्षेत्रातील बाधित शेतक:यांना 13 हजार 500 रूपये याप्रमाणे प्रशासनाकडून मदत देण्यात येणार आह़े कृषी विभागाने 31 जानेवारी अखेर पूर्ण केलेल्या पंचनाम्यांच्या अहवालानुसार त्या-त्या तहसीलदार कार्यालयाकडून मदतीची रक्कम भरून याद्या प्रसिद्ध होणार आहेत़ यानंतर तात्काळ शेतक:यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आले आह़े शासनाने बोंडअळीग्रस्त शेतक:यांसाठी 89 कोटी 65 लाख 22 हजार रूपयांची मदत जाहिर केली आह़े या मदतीसाठी 85 हजार 895 शेतकरी पात्र ठरले आहेत़ कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार 95 हजार 802 हेक्टर क्षेत्रावरील कापूस बोंडअळीग्रस्त असल्याचे कृषी विभागाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले होत़े शेतक:यांना कोरड आणि बागायत अशा दोन गटातून मदत मिळणार आह़े या शेतक:यांच्या याद्या त्याच प्रकारे तयार करण्याचे काम महसूल प्रशासनाने हाती घेतले आह़े कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांच्या प्रती महसूल विभागाला प्राप्त झाल्याने त्या-त्या गावांचे तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांच्या माध्यमातून ही रक्कम वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े
जिल्ह्यासाठी जाहिर करण्यात आलेली रक्कम शेतक:यांना तीन टप्प्यात देण्यात येणार आह़े यात बाधित क्षेत्राच्या टक्केवारी नुसार रक्कम वितरीत करण्याचा प्रयत्न महसूल विभागाचा राहणार आह़े बाधित शेतक:यांना वाटप करावयाची मदतनिधीची रक्कम शेतक:यांच्या आधार संलगिअत बँक खात्यांमध्येच वर्ग करण्याचे शासनाचे आदेश आहेत़