सुटीच्या दिवशीही सुरू राहतील मदत केंद्र कजर्माफी अर्ज : 15 सप्टेंबर शेवटची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:41 PM2017-08-26T12:41:47+5:302017-08-26T12:41:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतक:यांचे कजर्माफीचे अर्ज भरून घेण्यासाठी सुटीच्या दिवशी देखील महा ऑनलाईन केंद्र, आपले सरकार केंद्र व कॉमन सव्र्हीस सेंटर सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिका:यांनी दिली.
शेतक:यांना कृषी कर्ज माफ करण्यासाठी पात्र शेतक:यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील महा ऑनलाईन केंद्र, आपले सरकार केंद्र, कॉमन सव्र्हीस सेंटर येथे ऑनलाईन अर्ज भरता येत आहेत. आतार्पयत 19 हजार 763 शेतक:यांनी अर्ज भरले आहेत.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर्पयत आहे. त्यामुळे या सुविधेपासून एकही शेतकरी वंचीत राहू नये याकरीता सर्व संबधित केंद्र ही सुटीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहेत.
केंद्रांवर शेतकरी पती-प}ी यांनी एकत्रीत जाऊन विनाशुल्क माहिती भरणा करावी. सोबत आधार कार्ड, कर्ज खाते क्रमांक, आधार कार्डशी संलगA असलेला मोबाईल, बचत खात्याचे पासबूक, शेताचा सातबारा आठ अ चा उतारा आदी बाबी सोबत घेवून जावे.
सर्व शासकीय केंद्रांवर नि:शुल्क अर्ज भरणा सुरू असल्याने शेतक:यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी व जिल्हा उपनिबंधक एस.वाय.पूरी यांनी केले आहे.