अरे चलारे शायमा, पेपर चाली :हायनात ना.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 11:45 AM2017-09-09T11:45:58+5:302017-09-09T11:45:58+5:30
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘अरे चला शायमा, पेपर चाली :हायनात.. दखा बरं नापास व्हई जाशात..’ ग्रामिण भागातील विद्याथ्र्याना ही आर्त विनवणी आहे शिक्षकांची. सध्या पायाभूत चाचणी परीक्षा शाळांमध्ये सुरू असल्याने विद्याथ्र्यानी शाळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी यासाठी ग्रामिण भागातील शिक्षकांना प्रचंड धडपड करावी लागत आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेअंतर्गत राज्यात सर्व शाळांमध्ये पायाभूत चाचणी परीक्षा सुरू आहे. पहिली ते आठवीर्पयत या परीक्षा घेण्यात येत असून त्यात चाचणी परीक्षेसह प्रात्यक्षिक परीक्षाही घेण्यात येत आहे. या परीक्षेत विद्याथ्र्याला किमान 65 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. त्यावरच गुणवत्ता अवलंबून असल्याने शाळांतर्फे व शिक्षण विभागातर्फे प्रगत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रय} सुरू आहेत.
ग्रामिण भागातील शाळांची स्थिती पाहिल्यास बहुतांश शाळांमध्ये पटावरील विद्यार्थी संख्या मोठी असली तरी प्रत्यक्ष शाळेत हजर राहणा:या विद्याथ्र्याची संख्या फार कमी असते. त्यामुळे काही गावात शिक्षकांना रोज शाळेत आल्यानंतर अर्धा ते एक तास गावात फिरून विद्याथ्र्याना शाळेत येण्याचे आवाहन करावे लागते. बहुतांश विद्यार्थी गरीब कुटूंबातील असल्याने हे विद्यार्थी आपल्या पालकांना मदतीसाठी शेतावर अथवा इतर ठिकाणी कामावर जातात. त्यामुळे ते नियमित शाळेत येऊ शकत नाही. काही पालकही साक्षर नसल्याने ते देखील विद्याथ्र्याच्या शिक्षणाबाबत फारसे जागृत नाहीत. अशा स्थितीत शिक्षकांनाच पालकांची विनंती करून मुलांना शाळेत आणावे लागते.
सध्या पायाभूत चाचणी परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे बहुतांश शिक्षक गावातील पाडय़ात जावून विद्याथ्र्याना परीक्षा देण्यासाठी या अशी विनंती करीत आहेत. शुक्रवारी ग्रामिण भागातील काही गावांना फेरफटका मारला असता विदारक चित्र दिसून आले. एका पाडय़ावर दोन शिक्षक जावून विद्याथ्र्याना एकेकाचे नाव घेत चला रे शाळेत परीक्षा आहे अशी विनंती करीत होते.
एका गावात एका पाडय़ावर शिक्षकांनी मुलांनी शाळेत यावे यासाठी चक्क दवंडी देत सारखेच फिरावे लागले. यासंदर्भातील एका शाळेच्या व्हीडीओ देखील व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याने त्याबाबत देखील जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात एकच चर्चा होती.