निनावी ई-मेलमुळे नंदुरबार स्थानकावर ‘हाय अलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:40 AM2018-10-22T11:40:09+5:302018-10-22T11:40:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चैन्नई-जोधपूर रेल्वेत बॉम्ब ठेवला असल्याच्या गुप्त माहितीवरुन नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर खबरदारीचा उपाय म्हणून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चैन्नई-जोधपूर रेल्वेत बॉम्ब ठेवला असल्याच्या गुप्त माहितीवरुन नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली होती़ दोंडाईचा येथे चैन्नई-जोधपूर रेल्वेची तपासणी करण्यासाठी नंदुरबार येथील बॉम्ब शोधक पथक दुपारी रवाना झाले होत़े साधारणत: दीड तास रेल्वेची तपासणी करण्यात आली होती़
चैन्नई रेल्वे प्रशासनाला एका आतंकवादी संघटनेने ई-मेल करुन चैन्नई-जोधपूर रेल्वेत बॉम्ब ठेवला असल्याची माहिती दिली होती़ त्यानुसार दुपारी 3 वाजेनंतर संबंधित सर्व रेल्वे स्थानकांवर ‘हाय अलर्ट’ करण्यात आले होत़े नंदुरबार रेल्वे स्थानकावर दुपारी 4.50 वाजता येणारी चैन्नई-जोधपूर एक्सप्रेस तत्पुर्वी दोंडाईचा येथे तपासणीसाठी थांबवण्यात आली होती़ दोंडाईचा येथे रेल्वेची तपासणी करण्यासाठी नंदुरबार येथील बॉम्ब शोधक पथकातील कर्मचारी रवाना करण्यात आले होत़े साधारणत दीड तास रेल्वेची कसून तपासणी करण्यात आली होती़ त्या पाश्र्वभूमिवर नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावरही तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता़
नंदुरबार रेल्वे स्थानकाबाहेर दोन रुग्णवाहिका तसेच एक अगAीशमण बंब बोलवण्यात आले होत़े महाराष्ट्र पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान स्थानकाच्या विविध ठिकाणी तैनाद करण्यात आले होत़े चैन्नई-जोधनपूर रेल्वे नंदुरबार स्थानकावर आल्यावरही गाडीची तपासणी करण्यात आली होती़