अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन झाल्यास भरघोस उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:24 AM2019-07-11T11:24:51+5:302019-07-11T11:24:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मिरची पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. ढोबळ पद्धतीने खत व्यवस्थापन होत असल्यामुळे ...

Higher production in the event of management of nutrients | अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन झाल्यास भरघोस उत्पादन

अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन झाल्यास भरघोस उत्पादन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मिरची पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. ढोबळ पद्धतीने खत व्यवस्थापन होत असल्यामुळे उत्पादन कमी होत असल्याचेही छत्तीसगढचे मिरची तज्ज्ञ नवीन पेडीयार यांनी सांगितले. 
डॉ.हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र कोळदा येथे मिरची पिकावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यात छत्तीसगढ मधील प्रख्यात मिरची तज्ञ नवीन पेडीयार यांनी मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृष्णदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्ह्यातील प्रमुख मिरची उत्पादकांची उपस्थिती लाभली. मागील हंगामात लाल व हिरव्या मिरचीला मिळालेला दर व सध्याच्या हंगामात लांबलेल्या पावसामुळे ब:याच शेतक:यांचा कल मिरची पिकाकडे दिसू लागला आहे. या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्राद्वारे कृषक मंडळात मिरची पिकावर एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले होते.
असंतुलित ढोबळ पद्धतीने खत व्यवस्थापन केल्यामुळे मिरचीच्या मुळांच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात क्षार वाढत असतात व याचा फटका मिरची पिकाच्या कायिक वाढीवर आणि  उत्पादनावर होत असल्याचे प्रतिपादन नवीन यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आर.एम. पाटील यांनी मिरची पिकाची जिल्ह्यातील सद्य:स्थिती शेतक:यांसमोर मांडली. मिरची उत्पादकांना आपल्या अडचणींच्या निरसनासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला मिरची उत्पादकाच्या शेतात एकत्रित येण्याचे पाटील यांनी सूचित केले. दरम्यान, जिल्ह्यातील मिरची उत्पादकांसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला असून, जिल्ह्यातील समस्त मिरची उत्पादकांनी यासाठी आपले नंबर देण्याचे, ही आवाहन करण्यात आले.
कृष्णदास पाटील यांनी शेतक:यांना कृषी विज्ञान केंद्राच्या सानिध्यात राहून केंद्राद्वारे वेळोवेळी विविध पिकांवर होत असलेले मार्गदर्शन घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात लाल व हिरव्या मिरचीचे शहादा तालुक्यात 39 टन प्रति एकर विक्रमी उत्पादन घेणारे औरंगपूर येथील विक्की पटेल तसेच नंदुरबार तालुक्यात 45 टन प्रति एकर विक्री उत्पादन घेणारे सावळदा येथील रामेश्वर पटेल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रगतीशिल शेतकरी योगेश पटेल, आशिष पटेल, प्रविण पाटील यांनीही अनुभव मांडले. सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ पी.सी. कुंदे यांनी केले. जयंत उत्तरवार, उमेश पाटील, आरती देशमुख, राजेश भावसार, विजय बागल, डॉ.महेश गणापुरे, गीता कदम, राहुल नवले, कल्याण पाटील, रजेसिंग राजपूत, किरण मराठे, कैलास सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

या प्रशिक्षणात मिरची तज्ञ नवीन पेडीयार यांनी शेतक:यांना मिरचीच्या रोप निर्मितीपासून तर मिरची पिकातील फटीर्गेशन, रोग, कीड नियंत्रणावर विस्तृत मार्गदर्शन केले. मिरची पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्वाचे असून, यासाठी फटीर्गेशन रोपांच्या लागवडीनंतर आठवडय़ाभरात प्रारंभ करणे महत्वाचे आहे. 
 

Web Title: Higher production in the event of management of nutrients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.