आर्थिक फसवणूक आणि बदनामी करणारे सायबर गुन्हे सर्वाधिक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 01:08 PM2020-12-25T13:08:45+5:302020-12-25T13:09:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  सोशल मिडियाचे वाढते प्रस्थ लक्षात घेता त्याचा गैरवापर देखील वाढू लागला आहे. फेक अकाऊंट ...

The highest number of cyber crimes involving financial fraud and defamation | आर्थिक फसवणूक आणि बदनामी करणारे सायबर गुन्हे सर्वाधिक दाखल

आर्थिक फसवणूक आणि बदनामी करणारे सायबर गुन्हे सर्वाधिक दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  सोशल मिडियाचे वाढते प्रस्थ लक्षात घेता त्याचा गैरवापर देखील वाढू लागला आहे. फेक अकाऊंट तयार करून त्याद्वारे ब्लॅकमेल करणे, ॲानलाईन आर्थिक गंडा घालणे, सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी करणे, जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणे यासारखे प्रकार वाढले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात दोन वर्षात अशा प्रकारचे ३७ गुन्हे घडले असून त्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास पुर्ण करण्यात आला आहे.
सशोल मिडियावरील पोस्टमुळे तसेच ॲानलाईन फसवणुकीमुळे अनेकांना गंडविण्यात आल्याचे प्रकार वारंवार घडतात. बनावट अकाऊंट तयार करून त्याद्वारेे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पुरुषांना आकर्षीत केले जाते. त्याद्वारे जवळीकता वाढवून अशा व्यक्तींना आर्थिकदृष्टया फसविले जाते. त्यात गिफ्ट पाठविणे, जवळीकता साधून नंतर चारित्र्यासंबधी बदनामी करण्याची धमकी देऊन त्याद्वारे आर्थिक मागणी करणे असे प्रकार घडत असतात. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत तर काहींना आपले जीवन संपवावे लागले आहे. 
महिला, पुरुषांच्या चारित्र्याच्या गुन्ह्यांसह धार्मिक तेढ निर्माण करण्याचे गुन्हे देखील घडले आहेत. सोशल मिडियावर दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणल्याप्रकरणी देखील गुन्हे दाखल आहेत. कोरोना काळात चुकीच्या पोस्ट टाकणे आणि लोकांमध्ये भय निर्माण करणे याप्रकरणी देखील तक्रारी दाखल आहेत. 
सर्वाधिक तक्रारी व गुन्हे हे ऑनलाईन फसवणुकीचे झाले आहेत.  बॅंकेतून अधिकारी बोलत असल्याचे सांगून एटीएम नवीन तयार करणे, बंद असणे यासह इतर समस्या सांगून बॅंक डिटेल्स मिळविणे, एटीएमचा ओटीपी मिळविणे व त्याद्वारे आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यासंर्भातील गुन्हे देखील दाखल आहेत. 

गुन्हे दाखल झाल्यानंतर पुढे काय?
नंदुरबार पोलीस दलात सायबर कक्ष अद्ययावत आहे. प्रशिक्षीत कर्मचारी या ठिकाणी आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर सायबर तज्ज्ञांच्या मदतीने त्याची उकल करण्याचा प्रयत्न होतो. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्यांची उकल करण्यासाठी किचकट प्रक्रिया असते.

वर्षात सर्वाधिक गुन्हे कुठले घडले 
यंदाच्या वर्षात तेढ निर्माण करणे, ॲानलाईन आर्थिक फसवणूक करणे या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे याशिवाय सोशल मिडियांवर बदनामी करण्याचेही गुन्हे घडले आहेत. स्थानिक गुन्ह्यांची चौकशी झालेली असून आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. 

Web Title: The highest number of cyber crimes involving financial fraud and defamation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.