सिंदगव्हाण व कमलाडी येथे हिंदू राष्ट्र जागृती सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:39 PM2018-05-26T12:39:55+5:302018-05-26T12:39:55+5:30
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 26 : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तालुक्यातील सिंदगव्हाण व कलमाडी येथे ‘हिंदू राष्ट्र जागृती सभा’ आयोजित करण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभांना प्रारंभ झाला. ‘हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्यक्ष कृतीची दिशा’ या विषयावर समितीचे डॉ.नरेंद्र पाटील यांनी तर ‘परात्पर गुरु डॉ.आठवले यांचे हिंदू राष्ट्र स्थापनेविषयीचे विचार’ या विषयावर सनातन संस्थेचे डॉ.सतीश बागुल यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सनातन संस्था निर्मित ग्रंथ आणि सात्विक उत्पादनांचा कक्ष लावण्यात आला होता. त्यास चांगला प्रतिसाद लाभला.
या सभेचे वैशिष्टय़ म्हणजे सभेचे नियोजन गावातील धर्मप्रेमी नागरिकांनीच केले होते. सिंदगव्हाण येथील मंदिर विश्वस्तांतर्फे ध्वनीक्षेपक, विद्युत व्यवस्था, टेबल यांची व्यवस्था करण्यात आली होती. कलमाडी येथील राजे शिवाजी मंडळाने सभेचे यशस्वी आयोजन केले. सभेला शरदचंद्र पाटील, अजय पाटील, विलास पाटील, जयेश पाटील, विपुल पाटील, हिरालाल पाटील, वैभव पाटील, जयेश क्षिरसागर, कलमाडीचे सरपंच डॉ.राजेंद्र पाटील, माजी सरपंच बाजीराव पाटील, नरेंद्र पाटील, प्रमोद पाटील, शिवाजीराव पाटील, भटू पाटील, सुमीत परदेशी, आकाश गावीत, राहुल सैंदाणे, मयूर चौधरी, भावना कदम यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन राजू चौधरी यांनी केले.