गुजर समाजातील ऐतिहासिक सामूहिक विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 07:12 PM2018-02-18T19:12:14+5:302018-02-18T19:12:21+5:30
निझर येथे एकवटले समाज बांधव : 23 जोडपी विवाहबद्ध, शिस्तीचे दर्शन, हजारोंची उपस्थिती
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़18 : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमावर्ती भागात स्थिरावलेल्या गुजर समाजातील निझर येथे झालेला सामूहिक विवाह सोहळा हा समाजासाठी ऐतिहासिक म्हणून नोंदला गेला. समाजात प्रथमच एकाचवेळी 23 जोडपी विवाहबद्ध झाले असून या सोहळ्यासाठी हजारो समाज बांधव एकवटले होते.
नंदुरबार जिल्ह्यात तथा गुजरात आणि मध्य प्रदेशातील सीमेवरील भागात गुजर समाजाचे मोठे वास्तव्य आहे. स्व.पी.के. अण्णा पाटील यांनी या समाजातील विवाह सोहळ्यांना लावून दिलेली शिस्त ही सर्वत्र कौतुक आणि चर्चेचा विषय आहे. या समाजात सामूहिक विवाह सोहळा ही संकल्पना नवीन रुढ झाली. गेल्यावर्षी प्रायोगिक स्तरावर प्रकाशा येथे झालेल्या सोहळ्यानंतर यंदा मात्र प्रथमच भव्य स्तरावर हा सोहळा झाला. त्यात 23 जोडपी विवाहबद्ध झाली. या सोहळ्यात सर्वाधिक जोडपी विवाहबद्ध झाल्याने समाजातील तो एक ऐतिहासिक सोहळा ठरला. त्यासाठी निझर येथील गुजर समाज युवक मंडळ व गुजर समाज मंच यांनी पुढाकार घेतला होता.
सकाळपासूनच या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरूनही मोठय़ा प्रमाणावर समाज बांधव जमले होते. लगआचा मुहूर्त 10 वाजून 55 मिनीटांचा होता. त्यामुळे सकाळी साडेनऊ वाजताच नवरदेवांची सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. लगअ मंडपात प्रत्येक जोडप्यांसाठी स्वतंत्र व्यासपीठ व त्याला क्रमांक देण्यात आला होता. त्यानुसार त्या-त्या व्यासपीठावर वर-वधू विराजमान होऊन त्यांच्यासमोर त्याच वर-वधूचे नातेवाईकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक जोडप्यांना विधीसाठी स्वतंत्र पुरोहित नेमण्यात आले होते. मंगलाष्टक मात्र सामूहिकपणे म्हणण्यात आले व नियोजित वेळेवर लगअ लावण्यात आले.
या वेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, गुजर समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील, आमदार सुनील गावीत, गुजरातमधील सुमूल डेअरीचे संचालक भरतभाई सुदामभाई पटेल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, भाजपचे प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील, पं.स.चे माजी सभापती माधव जंगू पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, व्हा.चेअरमन जगदीश पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील
आदी उपस्थित होते.