तळोदा नगरपालिकेच्या 150 वर्षाच्या इतिहासात आठवेळा महिला राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:01 PM2017-11-29T12:01:12+5:302017-11-29T12:01:20+5:30

In the history of 150 years of Taloda Municipality, women's Seven has been ruled out | तळोदा नगरपालिकेच्या 150 वर्षाच्या इतिहासात आठवेळा महिला राज

तळोदा नगरपालिकेच्या 150 वर्षाच्या इतिहासात आठवेळा महिला राज

Next
ंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा नगरपालिकेच्या 150 वर्षाच्या इतिहासात आठवेळा महिला राज आले असून सर्वप्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान एका आदिवासी महिलेला मिळाला आहे. याशिवाय थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचाही पहिला मान आदिवासी महिलेलाच प्राप्त झाला आहे हे विशेष.तळोदा पालिकेची पालिकेची स्थापना 1867 मध्ये झाली आहे. साहजिकच ही पालिका ब्रिटिशकालीन ओळखली जाते. त्यामुळे या पालिकेने आतापवेतो 28 नगराध्यक्ष दिले आहेत. एक-दोन जण वगळता बहुतेक नगराध्यक्ष इतर मागासवर्गीय समाजातील होते. यात आठ महिलांनीही प्रतिनिधीत्व केले आहे. दोन्ही आदिवासी महिलांचाही यात समावेश आहे. मात्र नागराध्यक्षांच्या कार्यकाळाचा फलक पहिला तर इतिहासात पहिला महिला नगराध्यक्ष होण्याचा मानही आदिवासी महिलेलाच जातो. 1997 ते 2000 मध्ये दीपाली राजेंद्र वळवी ह्या नगराध्यक्षा होत्या. त्यांना तीन वर्षाच्या कालावधी मिळाला होता. त्यानंतर मार्च 2000 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने पक्षीय पातळीवर लढवून येथील बहुजन माळी समाजातील वंदना हेमलाल मगरे यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी नगराध्यक्षपद हे इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित होते. दरम्यान, भाजपअंतर्गत गटबाजी उफाळून आल्य नंतर उर्वरित वर्ष-दीड वर्षाच्या कलावधीसाठी भरत माळी यांच्या गटातील ताराबाई जगनसा बागूल ह्या निवडून आल्या होत्या. हेमलता बच्चूसिंग परदेशी यांनीही 2001 मध्ये काही दिवसांसाठी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. 2002 मध्ये पुन्हा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड झाली. हे पद आदिवासी महिलेकरिता राखीव झाले होते. विमलबाई काशीनाथ सोनवणे ह्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या योजना भरत माळी विराजमान झाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसच्याच र}ाबाई सुभाष चौधरी ह्या नगराध्यक्षपदी आहेत.

Web Title: In the history of 150 years of Taloda Municipality, women's Seven has been ruled out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.