शेतकरीविरोधी काळ्या कायद्यांची नंदुरबारात होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:36 AM2021-01-16T04:36:11+5:302021-01-16T04:36:11+5:30
केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन काळे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत. यासाठी संपूर्ण देशभर या कायद्याच्या विरोधात ...
केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन काळे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत. यासाठी संपूर्ण देशभर या कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वणवा पेटला आहे. देशातील लाखो शेतकरी दिल्ली सीमेवर ठाण मांडून बसलेले आहेत. जिवाची बाजी लावत लढत आहेत. आतापर्यंत सात शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. देशातील ५०० जनसंघटना मिळून किसान संयुक्त मोर्चा स्थापन करून हे आंदोलन सुरू केलेले आहे, तरीही केंद्र सरकारने हे कायदे रद्द केलेले नाहीत. उलट सर्वोच्च न्यायालयामार्फत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. न्यायालयाने कायदे पूर्णतः रद्द करण्याऐवजी त्याला फक्त स्थगिती दिली आहे व जे कृषी कायदे व भाजप सरकारच्या धोरणाचे समर्थक आहे, त्यांची समिती गठीत करून बड्या उद्योगपती व कॉर्पोरेट लॉबीचे काम सोपे करीत आहेत. हे शेतकऱ्यांना अमान्य आहे. या तथाकथित कमिटीचा धिक्कार करून या कायद्याच्या प्रतींची होळी करण्यात आली. या आंदोलनात अरुण रामराजे, नाना ठाकरे, रवी मोरे, सुनील साळवे, कैलास पेंढारकर, दीपक भालेराव, दगा भगा मोरे, विजय पवार, बापू ठाकरे, विजय पवार, वनाशीबाई ठाकरे, अरुणाबाई भिल, सुकमाबाई भिल यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष गवई गट, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.