विद्याथ्र्याचे वर्गातच निवास अन शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 10:35 AM2017-08-28T10:35:39+5:302017-08-28T10:35:39+5:30
चुलवड आश्रमशाळा : पिण्याचा पाण्याचा बोअर बंद, रिक्त पदांमुळे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : शिक्षण घ्यावे त्याच वर्गात मुक्काम, पिण्याच्या पाण्याची सुविधा कुचकामी तसेच महत्त्वाच्या सुविधाही तोकडय़ा ठरत असल्याने चुलवड ता़ धडगाव येथील आश्रमशाळेतील विद्याथ्र्याची सध्या आबाळ सुरू आह़े असुविधांच्या गराडय़ात असलेल्या या विद्याथ्र्याच्या शिक्षणावर परिणाम होण्याची चिन्हे असल्याने पालकही चिंतेत आहेत़
चुलवड येथे 1972 पासून तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्यावतीने पहिली ते 10 वी च्या वर्गासाठी शासकीय आश्रमशाळा चालविली जात आह़े तत्कालीन आमदार रमेश पावरा यांनी या शाळेच्या बांधकामासाठी चुलवड गावाजवळ जागा मिळवून दिल्यानंतर ही शाळा सुरू झाली होती़ 45 वर्षापूर्वी सुरू झालेल्या आश्रमशाळेत सुविधांच्या नावाने आजही केवळ समस्या पुढे येत आहेत़ 45 वर्षापूर्वी उभारलेली इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आह़े याठिकाणी नवीन इमारत उभी रहावी यासाठी तळोदा प्रकल्प कार्यालयाकडे ग्रामस्थ आणि पालक यांनी पाठपुरावा करूनही कारवाई झालेली नाही़ भिंती पूर्णपणे जीर्ण झाल्या असून, छतावरचे पत्रे पूर्णपणे जीर्ण झाले आहेत़ आश्रमशाळेतील काही पत्रे वा:याने उडाल्याने मोजक्या खोल्यांमध्ये विद्यार्थी निवास आणि शिक्षण घेऊ शकत आहेत़ तेथेच निवास आणि तेथेच शिक्षण यामुळे विद्याथ्र्याना अडचणी येत आहेत़ अनेकवेळा आदिवासी विकास विभागाकडे शाळा प्रशासनाने मांडूनही उपयोग झाला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आह़े याकडे तळोदा प्रकल्प कार्यालयाने लक्ष देण्याची मागणी पालकांची आह़े याबाबत विजय पावरा, लाला पराडके यांच्यासह पालकांनी आदिवासी विकास विभागाकडे निवेदना देऊन पाठपुरावा केला आह़े