शहादा तालुक्यात हरभ:यावर ‘मर’रोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:54 AM2018-01-08T11:54:55+5:302018-01-08T11:54:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
परिवर्धे : शहादा तालुक्यातील परिवर्धे परिसरातील गावांमध्ये हरभरा पिकावर बुरशीयुक्त मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आह़े यामुळे पिक उपटून फेकण्याची वेळ शेतक:यावर आली असून या पिकांची पाहणी कृषी विभागाच्या पथकाकडून करण्यात आली़
परिसरात गेल्या काही दिवसात वाढ झालेले हरभरा रोप कोरडे होत असल्याचे शेतक:यांना दिसून येत होत़े कोरडय़ा होणा:या झाडांवरचा फुलोरा गळत असल्याने उत्पादनापासून शेतकरी वंचित झाले होत़े या समस्येबाबत शेतक:यांनी कृषी विभागाच्या अधिका:यांसोबत चर्चा केली होती़ यानुसार प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दिपक पटेल, तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर, मंडळ कृषी अधिकारी भगवान पाटील, वसंत मराठे , कृषी अधिकारी सुरेश बागुल धुळे कृषी विज्ञान केंद्राचे म्हसके, महेंन्द पटेल यांनी भेट देत शेतक:यांसोबत चर्चा केली़ यावेळी शेतक:यांना विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली़ परिवर्धे, वाघोदा आणि कार्थदा परिसरात हा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आह़े
बदललेले वातावरण आणि जमिनीचे प्रदूषण यातून बुरशीची लागण होऊन हरभरा पिकाचे नुकसान होत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आह़े हा प्रकार थांबवण्यासाठी कारवाई करण्याची माहिती कृषी विभागाने दिली आह़े शेतकरी नाना छगन पाटील, महेंद्र मोहन पाटील, भाईजी छगन पाटील उपस्थित होत़े