वाण्याविहीर येथील शिक्षकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:36 AM2021-09-17T04:36:27+5:302021-09-17T04:36:27+5:30
या कार्यक्रमात वाण्याविहीर येथील श्री सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयातील वरिष्ठ हिंदी शिक्षक संजय राणे, दिनेश पवार ...
या कार्यक्रमात वाण्याविहीर येथील श्री सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयातील वरिष्ठ हिंदी शिक्षक संजय राणे, दिनेश पवार व नीलेश चिंचोले यांना जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छींद्र कदम यांच्या हस्ते ‘हिंदी भाषा रत्न सन्मान-२०२१’ सन्मान ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख वक्ते नंदुरबार येथील जी.टी. पाटील महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. गजानन महाजन यांनी हिंदी भाषा कशी मधुर आहे त्याबाबत माहिती देऊन हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी हिंदी शिक्षकांना हिंदीच्या प्रचार-प्रसारसंबंधी आवाहन केले. सन्मान वितरणाचे वाचन हितेश चव्हाण व विश्वास गायकवाड यांनी केले. यावेळी ऋचा शिंदे या विद्यार्थिनीने सुमधुर गीत सादर केले. प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक प्रा.डॉ. उमेश शिंदे यांनी केले. मान्यवरांचा परिचय विशाल मच्छले यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुहास वळवी यांनी तर आभार प्रा. अनिल लोहार यांनी मानले.