कोकणीपाडय़ात वाघाची दहशत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 05:07 PM2018-08-03T17:07:29+5:302018-08-03T17:07:37+5:30
भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : झुडूपातून बाहेर आलेल्या वाघाने दगडावर उडी मारली, यावेळी खालच्या बाजूला उभा होतो़ मागे ग्रामस्थ होत़े वाघाच्या डरकाळीने गलीतगात्र झालेले काही पळत सुटले, वनविभागाचे अधिकारी वाघापासून पाच-दहा फूटावर होत़े पिरमध्येही असा भलामोठा वाघ पाहिला नव्हता़ अजूनही अंगाचा थरकाप होतो हा अनुभव आहे जयसिंग चौरे यांचा़ कोकणीपाडा ता़ नंदुरबार येथे पहिल्यांदा जयसिंग भिवा चौरे यांनी वाघ पाहून वनविभागाला माहिती दिली होती़ घटनेला 10 दिवस उलटले असले कोकणीडा येथील ग्रामस्थांच्या दैनंदिन कामांची घडी मात्र वाघाच्या ‘उडी’ने विस्कटली आह़े
कोकणीपाडा येथील गावाच्या दक्षिण क्षेत्रात टेकडय़ालगत शेती करून सामाजिक वनीकरणचा गट सांभाळणारे जयसिंग चौरे यांना 21 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वनीकरणातील झुडूपात वाघ दिसला होता़ या माहितीवरून वनविभागाने येथे 22 जुलै रोजी तपास सुरू केला होता़ दरम्यान ‘वाघ’ आल्याची माहिती कोकणीपाडा, निमगाव, निंबी, फुलसरे, जळखे आणि शिरवाडे येथे मिळाल्याने टेकडीखाली शेकडोंचा जमाव जमला़ यादरम्यान सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वन परिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी, मंडळ परिश्रेत्र अधिकारी प्रभाकर नगराळे यांच्यासह वनविभागाचे 10 कर्मचारी आणि 15 ग्रामस्थ टेकडय़ावर चढले, एका झुडपात वन्यप्राणी असल्याची खात्री झाल्यानंतर फटाके फोडण्यास सुरूवात झाली़़ आणि क्षणात पट्टेदार वाघ बाहेर आला़ किमान 200 किलो वजनाचा साधारण 270 सेंटीमीटर लांबी (शेपटीसह) आणि 90 सेंटीमीटर उंच असलेला वाघ डरकाळी फोडत 10 फूट उंचीच्या दगडावर सहज उडी मारूनच चढला, आणि तेवढय़ाच लांब असलेल्या दुस:या दगडावर उडी टाकून निव्वळ 10 ते 12 सेकंदात टेकडावरून उतरून पश्चिमेकडे निघून गेला़ उडी घेत असताना दगडाखाली लपलेल्या भिमसिंग चौरे यांना पृष्ठभागावर आणि वनमंडळ परिश्रेत्र अधिकारी प्रभाकर नगराळे यांना हातावर वाघाचा पंजा लागला़ प्रत्यक्ष पाच फूटावरून वाघ पहिलेल्या सर्वाची काही काळ भितीने गाळण उडाली तर ग्रामस्थांची भितीने पळापळ झाली़ ‘वाघ आला वाघ आला’ अशी ओरड करत काही जण गावाकडे पळाले तर काही जण शेतशिवारात लपल़े घटनेनंतर कोकणीपाडा सावरलं असलं तरीही वाघ पुन्हा दिसेल अशी भिती कायम आह़े यामुळे दुपारी पाच नंतर दक्षिण दिशेच्या टेकडय़ाच्या परिसरात माणसं जातच नाहीत़ मजूर लवकर कामे आटोपून घरी जातात़ शेतकरी दुपारी शेतीकामे करत असले तरी त्यांची नजर सारखी आजूबाजूला भिरभिरत असत़े पिकात जातानाही सावध पवित्रा घेत शेतकरी मार्गस्थ होत आहेत़ रात्रीच्या वेळी जळखे, फुलसरे, निंबी, कोकणीपाडा या गावांमध्ये नागरिक घराबाहेर झोपणे टाळतात़ शक्यतो माणसं गटानेच बाहेर जात आहेत़ वाघाचं कुतूहल असलं तरी वाघाच्या दहशतीने त्यांच्या मनात घर केलं आह़े वाघाबाबत अनेक उलटसुलट चर्चानाही ऊत आला आह़े यातून ब:याच अंधश्रद्धा डोकावत असल्याचे जाणवल़े आठ दिवस वन विभागाचे कर्मचारी टेकडय़ाखालच्या शेतात मुक्कामी होत़े त्यांनी जागोजागी गस्त करून पाहणी केली आह़े परंतू वाघाचं निशाण दिसून आलेले नाही़ येथून निघाल्यानंतर काळंबा शिवारात वाघाच्या पायांचे ठसे दिसून आले होत़े शिरवाडे व जळखे या दोन गावातही परिस्थिती पूर्वपदावर आली असली तरी ग्रामस्थांकडून सावधगिरी बाळगली जात आह़े