‘काठी’तील घोडेस्वार यंदा ‘हेल्मेट’धारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 11:50 AM2019-10-06T11:50:23+5:302019-10-06T11:50:29+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दसरा निमित्त काठी संस्थानचा होणा:या घोडय़ांच्या शर्यतींचे स्वरूपही आता कालानुरूप बदलू ...
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दसरा निमित्त काठी संस्थानचा होणा:या घोडय़ांच्या शर्यतींचे स्वरूपही आता कालानुरूप बदलू लागले आहे. यावर्षापासून सुरक्षेच्या दृष्टीने विशेष लक्ष केंद्रीत केले जात असून या शर्यतीतील घोडेस्वार आता हेल्मेट घालून धावणार आहेत.
सातपुडय़ातील काठी संस्थानचा दसरा सर्वदूर परिचीत आहे. या संस्थानचे राजे उमेद सरकार यांनी या शर्यतीला सुरुवात केली होती. ंतेंव्हापासून संस्थान अंतर्गत असलेल्या सर्व गावातील लोक दसरा निमित्त एकत्र येतात आणि अनोखा दसरा साजरा करतात. आता संस्थाने विलिनिकरण झाले असले तरी दस:याची परंपरा मात्र कायम टिकून आहे. विशेष म्हणजे त्या निमित्ताने होणा:या घोडय़ांच्या शर्यतीला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असल्याने ते एक आकर्षण ठरले आहे.
दसरा निमित्ताने सातपुडय़ाच्या अतिदुर्गम भागातील उमदे घोडे या ठिकाणी घोडे मालक स्पर्धेसाठी घेवून येतात. आजवर घोडय़ावर कुठलीही साज न टाकता अतिशय पारंपारिक पद्धतीने घोडेस्वार त्यावर आरुड होतो आणि स्पर्धेत सहभागी होतो. काठी येथेच धडगाव काठी रस्त्यावर सुमारे दोन किलोमिटर अंतरावर जोडीने घोडेस्वार धावतात. अलीकडे या स्पर्धामध्ये सहभागी होणा:या स्पर्धकांची संख्या वाढल्याने या स्पर्धा दोन दिवस चालतात. स्पर्धेपुर्वी परिसरातील सर्व गावातील आदिवासी एकत्र येवून नवाई खुंटाची पूजा करतात. त्यानंतर राजगादीची पूजा होते. या पुजेनंतर रस्त्यावर असलेल्या खुटीच्या ठिकाणी रावणाचे पूजन केले जाते. तेथेच घोडय़ांच्या नालचीही पूजा होते. आणि तेथून घोडय़ाच्या शर्यतीला सुरुवात होतात. ही शर्यत पहाण्यासाठी सातपुडय़ातील विविध गावातील हजारो नागरिक एकत्र येतात. रस्त्याच्या एका बाजुला डोंगर असून हा डोंगर शर्यतीचा रस्ता असलेल्या दोन किलोमिटर्पयत पुर्ण माणसांनी आच्छादलेला असतो. याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी असते.
घोडेस्वारांना हेल्मेट सक्ती या वर्षापासून स्पर्धक प्रत्येक घोडेस्वाराला सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच गेल्या काही वर्षातील अनुभव पहाता रस्त्याच्या दुतर्फा बॅरीकेट्स बांधण्यात येणार आहे. गेल्यावर्षी एक घोडा प्रेक्षकांच्या रांगेत गेल्याने धावपळ उडाली होती. त्याची काळजी घेतली जाणार आहे. यावर्षी सुमारे 100 घोडे स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा असून त्याची नोंदणी सुरू झाल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक सी.के.पाडवी यांनी दिली.