निधीमुळे आवास योजनांना आला वेग : अक्कलकुवा तालुक्यात स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:57 PM2018-04-19T12:57:49+5:302018-04-19T12:57:49+5:30

प्रधानमंत्री आवाससाठी 11 हजार लाभार्थी निधीमुळे आवास योजनांना आला वेग

Housing Plans To Come Up By Fund: The situation in Akkalkuwa taluka | निधीमुळे आवास योजनांना आला वेग : अक्कलकुवा तालुक्यात स्थिती

निधीमुळे आवास योजनांना आला वेग : अक्कलकुवा तालुक्यात स्थिती

Next

लोकमत ऑनलाईन
अक्कलकुवा, दि़ 19 : तालुक्यातील विविध 11 हजारांच्यावर लाभार्थीनी गेल्या 10 वर्षात आवास योजनांचा लाभ घेतला असून 2017-18 या आर्थिक वर्षात तब्बल 3 हजार 461 घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत़ शबरी आवास, रमाई घरकूल आणि प्रधानमंत्री आवास योजनेत लाभार्थीनी सहभाग घेतला आह़े 
पंचायत समितीकडून दुर्गम व अतिदुर्गम भागात आवास योजना यशस्वी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत़ लाभार्थीना घरकूल मंजूर झाल्यानंतर पहिला आणि दुसरा हप्ता मिळाल्यानंतर पुढील हप्त्यांसाठी  फिरफिर करावी लागत असल्याने  जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी निधी येताच लाभार्थीच्या खात्यात वर्ग करण्याचे म्टटले होत़े पंचायत समितीने यानुसार कामकाज करत आलेला निधी लाभार्थीच्या बँक खात्यांमध्ये वर्ग केल्याने योजना मार्गी लागली आह़े प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2017-18 या वर्षात पंचायत समितीला 3 हजार 44 घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होत़े याअंतर्गत 5 हजार 664 लाभार्थीनी अर्ज केले होत़े यात एकूण 3 हजार 113 लाभार्थीच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती़ योजनेला संपूर्ण वर्षात निधीचा पुरवठा झाल्याने लाभार्थीना मंजुरी देण्यात आलेल्या 1 लाख 20 हजार रुपयांच्या निधीचे पाच हप्ते पुरवण्यात आले होत़े यात 2 हजार 892 लाभार्थीना पहिला, 1 हजार 849 लाभार्थीना दुसरा, तर 20 लाभार्थीना तिसरा हप्ता वितरित करण्यात आला आह़े तालुक्यात 67 ग्रामपंचायत  क्षेत्रात या योजनेसाठी निधी वितरित करण्यात आला होता़ लाभार्थीच्या बँक खात्यावर वेळोवेळी घरबांधकामासाठी रक्कम मिळत गेल्याने बहुतांश लाभार्थीची घरे पूर्ण झाली आह़े 
तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 3 हजार 661 घरांना निधी देण्यात आला होता़ या सर्व घरांना निधी देण्यात आल्यानंतर घरे पूर्ण झाली होती़ एप्रिल 2017 पासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या त्रैमासिक अहवालात 372 घरे बांधून पूर्ण झाल्याची माहिती आह़े  

Web Title: Housing Plans To Come Up By Fund: The situation in Akkalkuwa taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.