मुलांनो कसे आहात? विचारल्याच्या रागातून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:30 AM2021-09-11T04:30:26+5:302021-09-11T04:30:26+5:30

नंदुरबार : मुुलांनोे कसे आहात? अशी विचारणा केल्याच्या रागातून चौघांनी केलेल्या मारहाणीत तीन जण जखमी झाल्याची घटना पाडळपूर, ता. ...

How are you kids Beating out of anger when asked | मुलांनो कसे आहात? विचारल्याच्या रागातून मारहाण

मुलांनो कसे आहात? विचारल्याच्या रागातून मारहाण

Next

नंदुरबार : मुुलांनोे कसे आहात? अशी विचारणा केल्याच्या रागातून चौघांनी केलेल्या मारहाणीत तीन जण जखमी झाल्याची घटना पाडळपूर, ता. तळोदा येथे घडली. याबाबत तळोदा पोलिसांत मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण जयसिंग ठाकरे, ललिताबाई जयसिंग ठाकरे व एक वृद्धा असे तीन जण जखमी झाले. तर राहुल सुभाष पाडवी, बादल सुभाष पाडवी, सचिन सुभाष पाडवी व दुर्गाबाई सुभाष पाडवी, रा. पाडळपूर, ता. तळोदा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, पाडळपूर येथील लक्ष्मण जयसिंग ठाकरे याने गावातील मुलांना कसे आहात म्हणून सहज विचारले. त्याचा राग मनात ठेवून सायंकाळी चौघे त्यांच्या अंगणात आले. त्यांनी अशी विचारणा का केली म्हणून वाद घातला. त्यातून लाकडी काठीने तसेच हाताबुक्क्यांनी लक्ष्मण व त्यांच्या घरातील मंडळींना बेदम मारहाण केली. त्यात तिघे जखमी झाले. याबाबत लक्ष्मण ठाकरे याने फिर्याद दिल्याने चौघांविरुद्ध तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार संजय नाईक करीत आहेत.

Web Title: How are you kids Beating out of anger when asked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.