त:हावद बालिकाश्रमात 174 विद्यार्थिनींची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:17 PM2019-07-13T12:17:49+5:302019-07-13T12:18:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील त:हावद येथील कस्तुरबा गांधी बालिकाश्रमात 11 बालिकांना उलटय़ा आणि अतीसाराचा त्रास झाल्याने तळोदा ...

In the Howrah Baliksharma, 174 students are examined | त:हावद बालिकाश्रमात 174 विद्यार्थिनींची तपासणी

त:हावद बालिकाश्रमात 174 विद्यार्थिनींची तपासणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील त:हावद येथील कस्तुरबा गांधी बालिकाश्रमात 11 बालिकांना उलटय़ा आणि अतीसाराचा त्रास झाल्याने तळोदा येथे दाखल करण्यात आले होत़े यातील तिघींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सुधारत आह़े 
घटनेनंतर गुरुवारी सकाळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ महेंद्रकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आरोग्य पथक त:हावद येथे तैनात करण्यात आल़े पहिल्या दिवशी या पथकाने येथे हजर असलेल्या 174 बालिकांची तपासणी केली़ यावेळी जलनमुने घेण्यात ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आल़े डॉ़चव्हाण, डॉ़ श्रीकांत पाटील, डॉ़ योगेश पाटील, परिचारिका ए़डी़मुनेश्वर, ज्योती जावरे, आरोग्य सेवक यु़आऱशिरसाठ यांनी विद्यार्थिनींसोबत संवाद साधत त्यांच्या तपासण्या केल्या़ दरम्यान तळोदा येथे दाखल केलेल्या 9 बालिकांवर उपचार करुन त्यांना गुरुवारी त:हावद येथे परत पाठवण्यात आल़े सर्व बालिकांची प्रकृती चांगली आह़े 
 

Web Title: In the Howrah Baliksharma, 174 students are examined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.