अक्कलकुव्यात पावणेसात लाखांची घरफोडी

By admin | Published: June 17, 2017 01:25 PM2017-06-17T13:25:34+5:302017-06-17T13:25:34+5:30

अक्कलकुवा येथील बांधकाम साहित्य व्यावसायिक मनोज राणालाल डागा हे कुटूंबियांसह रात्री घरातच असताना

Hundreds of millions of burglars in Pokate in Akkalkuwa | अक्कलकुव्यात पावणेसात लाखांची घरफोडी

अक्कलकुव्यात पावणेसात लाखांची घरफोडी

Next

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 17 -  अक्कलकुवा शहरात मुख्य बाजार रोडवरील व्यापा:याच्या घरातून चोरटय़ांनी पावणेसात लाख रूपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली़ या धाडसी घरफोडीमुळे अक्कलकुवा शहरात एकच खळबळ उडाली आह़े
अक्कलकुवा येथील बांधकाम साहित्य व्यावसायिक मनोज राणालाल डागा हे कुटूंबियांसह रात्री घरातच असताना गुरूवारी रात्री 11़30 ते शुक्रवारी पहाटे 5़30 वाजेच्या दरम्यान घरात प्रवेश करत घरातील पहिल्या मजल्यावरच्या कपाटात ठेवलेल्या अॅल्युमिनिअमच्या पेटीतील सहा लाख 84 हजार रूपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली़  डागा कुटूंबियांच्या झोपण्याच्या खोलीसोबत घरातील एका खोलीत कपाट ठेवलेले आह़े याच खोलीत चोरटय़ांनी प्रवेश करून चावीने कपाट उघडून, आत  ठेवलेली दागिन्यांची पेटी फोडून त्यातील दागिन्यांची चोरी केली़ चोरीचा प्रकार घडत असताना, घरात झोपलेल्या डागा कुटूंबियांना साधी कुणकुणही लागली नाही़ चोरटय़ांनी एक लाख आठ हजार रूपयांच्या सोन्याच्या अंगठय़ा, एक लाख आठ रूपयांचा सोन्याचा हार, एक लाख आठ हजार रूपयांचे सोन्याचे बाजूबंद, 27 हजारांची बिंदी, 94 हजार 500 रूपयांचा लक्ष्मीहार, 27 हजार रूपयांचा डोक्यावरचा बार,  एक लाख आठ हजार रूपयांचा 40 ग्रॅम वजनाचा बिस्कीटचा तुकडा, 24 हजार 500 रूपयांचे चांदीचे पुरातन दागिने तसेच 37 हजार 500 रूपयांचे छोटय़ा दागिने यासह 70 हजार रूपये रोख चोरटय़ांनी चोरून नेले आहेत़ सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मनोज डागा यांनी अक्कलकुवा पोलीसात दिलेल्या फिर्यादीनंतर अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
 पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी घटनास्थळावर सकाळी भेट देऊन पाहणी केली होती़ यावेळी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले तसेच श्वासपथक बोलावण्यात आल़े 

Web Title: Hundreds of millions of burglars in Pokate in Akkalkuwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.