नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो स्वयंसेवकांचा कोरोनामुक्तीच्या लढ्यात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:57 PM2020-04-19T12:57:12+5:302020-04-19T12:57:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात आणि देशात सध्या कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारी यंत्रणेसह स्वयंसेवी ...

Hundreds of volunteers from Nandurbar district participate in the fight for coronation | नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो स्वयंसेवकांचा कोरोनामुक्तीच्या लढ्यात सहभाग

नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो स्वयंसेवकांचा कोरोनामुक्तीच्या लढ्यात सहभाग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यात आणि देशात सध्या कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारी यंत्रणेसह स्वयंसेवी संस्था आणि विद्यापीठे, शैक्षणिक संस्थाही सहभागी झाल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातही विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभाग या कामात सहभागी झाला आहे.
जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे शेकडो स्वयंसेवक वेगवेगळ्या उपक्रमातून प्रबोधन व प्रत्यक्ष कृती करत प्रशासनाला हातभार लावीत आहेत. सरकारने सूचित केल्याप्रमाणे सगळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असलेले आरोग्य सेतू हे अ‍ॅप ४१५ स्वयंसेवकांनी डाऊनलोड केले आहे. ते ज्या गावाला आहेत तेथील नागरिकांनाही हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करत आहेत.
सोशल डिस्टन्स लक्षात घेऊन काही गावांमध्ये रासेयो विद्यार्थिनी आशा वर्कर सोबत जनजागृती करत आहेत तर काही स्वयंसेवक सार्वजनिक बैठकीच्या ठिकाणी आॅइल अथवा केमिकल टाकून एकत्र बसणार नाहीत त्यासाठी गर्दी कमी करत आहे. गावात विषाणुचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस दलामार्फत ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली. यातही स्थानिक गावांमध्ये २५ ते ३० स्वयंसेवक पोलीस मित्र म्हणून मदत करीत आहे.
सॅनिटायझरची निर्मिती व वापराची पद्धत यासाठी अक्कलकुवा येथील विज्ञान महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी डॉ.विजय पाटील यांनी महाविद्यालयाच्या लॅबमध्ये स्वत: हाताने सॅनिटायझर तयार करून प्रत्येकी ५० मिली चे ३०० बॉटल सोरापाडा गाव व परिसरात वाटप केले.
या वेळी २० स्वयंसेवकांना प्रशिक्षित केले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवकांनी रांगोळी, पोस्टर, कविता, गाणे व मनोगतातून जनजागृती केल्या. एस.टी.को. आॅफ एज्युकेशनच्या विज्ञान महाविद्यालयातील प्रा.भूषण निकम यांनी संस्थेच्या सहकार्याने स्वयंसेवकांच्या माध्यमातून अन्न धान्याच्या सहा हजार कीट वाटप केल्या. याशिवाय मास्क कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिक देत आहे.
नवापूर महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी छाया गावीत यांनी संस्था, नगरपालिका व आमदार शिरीष नाईक आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने एक हजार मास्क वाटप केले. तसेच ३० स्वयंसेवक शहरात आरोग्य सर्वेक्षण करत आहेत. जी.टी. पाटील महाविद्यालय, जिजामाता महाविद्यालय, साने गुरूजी महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, संत जगनाडे महाविद्यालय खापर, विसरवाडी येथील कला महाविद्यालय, बामखेडा येथील कला महाविद्यालय व इतर महाविद्यालयाचे २९१ स्वयंसेवकही गावात फवारणी, स्वच्छता, आरोग्य, रांगोळी, पोस्टर, कविता, गाणे, भाषण, अभिनय, गरजुंना अन्नधान्य इतर जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी स्थानिक पातळीवर मेहनत घेऊन प्रशासनाला सहकार्य करत आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील, प्र-कुलगुरू डॉ.माहुलीकर, कुलसचिव डॉ.पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप पाटील व सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य, राज्य संपर्क अधिकारी डॉ.अतुल साळुंखे, विभागीय संचालक डॉ.कार्तिकेयन, विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.माधव कदम, विभागीय समन्वयक डॉ.बी.एस. पाटील, डॉ.सुनील गरुड व कार्यक्रम अधिकारी मेहनत घेत आहे.

Web Title: Hundreds of volunteers from Nandurbar district participate in the fight for coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.