तळोदा तहसीलसमोर ग्रामस्थांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:35 PM2018-07-18T12:35:30+5:302018-07-18T12:35:34+5:30
आंदोलन : 5 टक्के निधीची चौकशी करण्याची मागणी
तळोदा : पेसाअंतर्गत मिळालेल्या निधीचा गैरवापर करणा:या समितीवर फौजदारी कारवाईची मागणी करुनही संबंधित प्रशासन याबाबत कार्यवाहीस टाळाटाळ करीत आह़े त्यामुळे याच्या निषेधार्थ प्रतापपूर येथील ग्रामस्थांनी मंगळवारी तळोदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आह़े
दरम्यान गटविकास अधिका:यांनी सदर समितीची चौकशी करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले आह़े
दरम्यान, जोर्पयत कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोवर उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय उपोषणकत्र्यानी घेतला आह़े पेसा कायद्याअंतर्गत आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींना गावाच्या विकासासाठी शासनाकडून पाच टक्के निधी दिला जातो़ हा निधी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर स्वंतत्र कोषनिधी समिती स्थापन केली जात आह़े प्रतापपूर ग्रामपंचायतीतदेखील अशी कोषसमिती स्थापन करण्यात आली आह़े
परंतु सदर समितीने पेसा निधीच्या खर्चाबाबत गैरवापर केला आह़े याबाबत आपल्या स्तरावर स्थापन केलेल्या चौधरी समितीनेसुध्दा तसा अहवाल सादर केला आह़े असे असताना संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वारंवार मागणी करुन आजर्पयत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही़ त्यामुळे प्रतापपूर येथील येथील जगन मोरे, हिरालाल मगरे, विजयसिंग पावरा, चंद्रसिंग मोरे या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाबाहेर मंगळवारी आमरण उपोषण सुरु केले आह़े