हळदाणी येथे पती-पत्नीची एकाच दोराला गळफास घेऊन आत्महत्या
By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: April 24, 2023 17:25 IST2023-04-24T17:23:58+5:302023-04-24T17:25:03+5:30
विसरवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे.

हळदाणी येथे पती-पत्नीची एकाच दोराला गळफास घेऊन आत्महत्या
मनोज शेलार, नंदुरबार : नवापूर तालुक्यातील हळदाणी गावाच्या शेतशिवारात पती-पत्नीने नैराश्याच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. याबाबत विसरवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे.
धेड्या हांजी गावित (५२) व त्याची दुसरी पत्नी कानुबाई पंतू गावित (४६) रा. दापूर हल्ली मुक्काम हळदाणी अशी मयतांची नावे आहेत. दोघांनी २३ एप्रिल रोजी हळदाणी गावाच्या शेतशिवारातील कंथू सुरजी गावित व सरज्या मोग्या गावित यांच्या शेताच्या बांधावर महू झाडाच्या फांदीला बैल बांधण्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. दोघांनीही एकाच वेळेस एका दोराला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नैराश्येच्या कारणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
याबाबत मयताचा मुलगा रोहन धेड्या गावीत याने विसरवाडी पोलिस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार नरेंद्र वळवी करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"