तारापूर शिवारात रेल्वेखाली आल्याने पती-पत्नी जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:15 AM2019-03-12T11:15:49+5:302019-03-12T11:16:25+5:30
तारापूर शिवारातील घटना : गावात हळहळ
विसरवाडी : सुरत-भुसावळ लोहमार्गावर तारापूरनजीक रूळ ओलांडत असताना अज्ञात रेल्वे इंजिनखाली अपघात होऊन पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुजित देविदास वळवी (२२) व त्याची पत्नी करिष्मा सुजित वळवी (२०) रा.तारापूर, ता.नवापूर असे मयतांची नावे आहेत. पोलीस सूत्रानुसार, रविवार, १० मार्च रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान सुरत-भुसावळ लोहमार्गावरील तारापूर गावाच्या शिवारात पोल क्रमांक १२१ ते १२८ दरम्यान हा अपघात घडला.
सुजित व करिश्मा हे दोघे पती-पत्नी रेल्वे रुळ ओलांडत असताना अज्ञात रेल्वे इंजिनखाली अपघात होऊन कापले गेल्याने जागीच ठार झाले. या घटनेत तरुण पती-पत्नीचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे
याबाबत मुलाचे आजोबा सेवा रडत्या वळवी यांनी विसरवाडी पोलीस स्टेशनला खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार भीमसिंह ठाकरे हे करीत आहेत.