मनोहारी धबधबा विकासाला पारखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:55 PM2019-12-01T12:55:23+5:302019-12-01T12:55:28+5:30
शरद पाडवी । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : थंड हवेच्या तोरणमाळ येथील सिताखाईच्या प्रसिद्ध धबधब्याशिवाय सातपुडय़ात हातधुई ता. धडगाव ...
शरद पाडवी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : थंड हवेच्या तोरणमाळ येथील सिताखाईच्या प्रसिद्ध धबधब्याशिवाय सातपुडय़ात हातधुई ता. धडगाव येथील ‘दवोअं काट’ या घाटातील धबधबा देखील पर्यटकांच्या दृष्टीने मने हिरावणारा ठरत आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या धबधब्याकडे अद्याप पर्यटन विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे निसर्ग संपन्न असून त्याचा विकास होऊ शकला नसल्याची खंत सातपुडय़ातील नागरिकांना होत आहे.
देशाच्या मध्यभागातून पसरलेल्या सातपुडा पर्वतात नंदुरबार जिल्ह्याचा देखील बहुतांश भाग येतो. जिल्ह्याच्या या भागात ठिकठिकाणी पर्यटकांना खुणावणारी स्थळे आहेत. त्यात तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असून तेथे प्रत्येक टेकडय़ा, नदी, नाले, घाट व रस्ते देखील पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत यात शंका नाहीच. परंतु सातपुडय़ात तोरणमाळशिवाय अन्य ठिकाण देखील थंड हवेचे व आकर्षकही आहेत. या अन्य ¨ठकाणांचा अद्याप कुठलाही विकास झाला नाही. खरे तर पर्यटन विकास विभागामार्फत या ठिकाणांकडे लक्ष दिले गेले नाही. परिणामी निसर्गसंपन्न असूनही पर्यटनाच्या दृष्टीने हा भाग उपेक्षित राहिला आहे.
सातपुडय़ाचाच एक अविभाज्य घटक असलेल्या हातधुई येथेही दोन आकर्षक धबधबे आहेत. दोन्ही धबधबे हे हातधुई व टेंबला येथील नाल्यांमुळे तयार झाले आहेत. दोन्ही घटातील खडक हे विशिष्ट प्रकारचे असल्यामुळे घाटाची कुठलीही क्षती होत नाही. खोल द:या असल्यामुळे वरुन पडणा:या पाण्यातून मधुर आवाज निघत असून त्याच आवाजाचा प्रतिध्वनी देखील येत असल्याने तेथे जाणा:या प्रत्येक व्यक्ती मनोमन निसर्गाच्या सानिध्यात हरवतो. कुठलाही कृत्रिम आवाज नसूल्याने गोंगाटाचा तेथे प्रश्नच उद्भवत नाही. केवळ तेथे पक्ष्यांचा आवाज अन् कोसळणा:या पाण्याचा ध्वनी-प्रतिध्वनीच कानावर पडतो.
या ठिकाणी घनदाट जंगल असून विविध आयुर्वेदिक तथा औषधी वनस्पती देखील आढळून येत आहे. या वनस्पती अनेक गांभीर आजारांवर गुणकारी असल्याचे तेथील नागरिकांमार्फत सांगण्यात येते. या वनस्पतींच्या संवर्धनासाठी शासनाच्या कुठल्याही यंत्रणेने पुढकार घेतला नाही. या धबधब्यांचा विकास तर दूरच, तेथे पोहोचण्यासाठी कुठलेही रस्ते तयार करण्यात आली नसल्याने नागरिकांमधून खंत व्यक्त करण्यात येत आहे. सद्यस्थितीत वाढत्या स्पर्धा व जबाबदा:यांमुळे विविध घटकातील बांधवांमध्ये ताण-तणाव वाढला आहे. हा ताण-तणाव घालवण्यासाठी समाजबांधव निसर्ग सुंदर ठिकाणांचा शोध घेत आहेत. हा शोध हातधुई येथील धबधबा, घाट व घनदाट जंगल पूर्ण करणारे ठरू शकतात. या घटांर्पयत जाण्यासाठी कुंडल, खुंटामोडी येथे उतरुन पायी जावे लागते. तर खर्डामार्गे हातधुई गावातूनही जाता येते. त्यामुळे या ठिकाणांचा विकास होणे अत्यावश्यक आहे. पर्यायाने त्यातून स्थानिकांना देखील काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी पर्यटन विकास विभागाकडून सातपुडय़ातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहे.
मोठय़ा धबधब्याच्या घाटावर हातधुई गावाचे देवस्थान आहे. तेथे वाघदेव, निली चाराय अशा काही निसर्गपूजा वर्षानुवर्षे होत आला आहे. त्यामुळे या घाटाला देवोअंकाट असे म्हटले गेले आहेत. तर दुस:या धबधब्याच्या घाटाला पूतीइ काट म्हणून तेथील भाषेत संबोधले जात आहे. घाट असलेली जागा घनदाट जंगलाची असली तरी हे वनक्षेत्र नसल्याचे तेथील नागरिकांमार्फत सांगण्यात येत आहे. या क्षेत्राचा काही भाग आदिवासी विकास विागाच्या शासकीय आश्रमशाळेच्या अखत्यारित येतो, तर काही भाग टेंबला येथील पारत्या हांद्या तडवी व हातधुई येथील गुज:या हनुमान वळवी यांचा असल्याचे वर्तविण्यात येत आहे.