कुणी कायदा हातात घेतल्यास गय करणार नाही -पोलीस अधीक्षक पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:36 AM2021-09-24T04:36:12+5:302021-09-24T04:36:12+5:30
अवैध दारू व गुटखा तस्करीबाबत ही ठोस उपाययोजना राबविण्यात येणार आहे. यासाठी दुर्गम भागात काही नेटवर्क आहे किंवा कसे, ...
अवैध दारू व गुटखा तस्करीबाबत ही ठोस उपाययोजना राबविण्यात येणार आहे. यासाठी दुर्गम भागात काही नेटवर्क आहे किंवा कसे, यात मुख्य सूत्रधार यांचाही शोध घेऊन थेट कारवाईच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
जिल्ह्यातील मोहल्ला कमिट्या, शांतता कमिट्या यांना अधिक सक्रिय करण्यात येईल. जेथे शक्य असेल ते पुनर्रचना करण्यासाठीही संबधितांना सूचना देण्यात येतील.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळताना पोलिसांचे मनोधैर्य, त्यांचे आरोग्य, त्यांची मानसिकता व त्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा यांनाही प्राधान्य राहणार आहे. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य, मानसिकता चांगली राहिली तर ते चांगले कर्तव्य बजावू शकतात. त्यामुळे या बाबींकडेही आपले विशेष प्राधान्य व लक्ष राहील. चांगले काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा वेळोवेळी सन्मान करण्यात येईलच त्यातून त्यांच्यात चांगल्या कामाची स्पर्धा होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, एलसीबीचे निरीक्षक रवींद्र कळमकर उपस्थित होते.