सफाई कामगारांना सुविधा न दिल्यास मुख्याधिका:यांना जबाबदार धरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:59 PM2018-04-01T12:59:57+5:302018-04-01T12:59:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सफाई कामगारांच्या समस्या सोडवून त्यांना लागणारे साहित्य 1 मे पयर्ंत देण्यात यावे, अन्यथा पालिका मुख्याधिका:यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी सफाई कर्मचा:यांच्या आढावा बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालिका सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत जिल्ह्यातील पालिका मुख्याधिका:यांची आढावा बैठक घेण्यात आली़ यावेळी डॉ.कलशेट्टी बोलत होते. यावेळी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे राजस्व अध्यक्ष नागेश कंडारे, जिल्हाध्यक्ष कुंदन थनवार, सचिव धनराज पिवाल, सुरेश बिसनारे, प्रकाश सोलंकी, अजय गुजरे उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सांगितले की, सफाई कामगार हा सकाळी उठून गाव, शहर सफाईचे काम करतो़ त्यांच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. कामगारांचे शारिरीक, मानसिक सक्षमीकरणासाठी प्रय} करावेत, त्यांच्या मागण्यांकडे प्राधान्याने लक्ष द्याव़े
सभेत पालिका कर्मचा:यांच्या समस्यांबाबत 22 फेब्रुवारीला अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर चर्चा झाली़ निवेदनात पुरुषांना तीन ड्रेस व महिलांना तीन साडय़ांसह 12 व 24 वर्षे पूर्ण सेवा झालेल्या कामगारांना कालबद्ध वेतनश्रेणी, आवासित प्रगती योजनेंतर्गत लाभ देऊन फरक अदा करावा, स्थायी प्रमाणपत्र द्यावे, दरमहा पगारपत्रक, भविष्यनिर्वाह निधीची वार्षिक स्लिप, अंशदान निवृत्तीवेतन कपातीची वािर्षक स्लिप, दुय्यम सेवा पुस्तक द्यावे, मेहतर वस्तीत नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात, लाड-पागे समितीच्या समितीच्या धोरणांची अंमलबजावणी करावी, 25 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचा:यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेमध्ये मोफत घरकुल तयार करुन द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या़
या निवेदनाबाबत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी पालिका मुख्याधिका:यांना विचारणा केली होती़ त्यावर मुख्याधिका:यांकडून कोणतीही अंमलबजावणी न झाल्याचे सांगण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली़